एक्स्प्लोर

MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीसाठी अजितदादा गटाचे उमेदवार ठरले? शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकरांना संधी मिळण्याची दाट शक्यता

Maharashtra Politics: येत्या 12 तारखेला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ठाकरे गटाने 11 व्या जागेवर विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास चुरस निर्माण होऊ शकते.

मुंबई: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला पाच, शिंदे गट 2 आणि अजितदादा गटाच्या वाट्याला विधानपरिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. या दोन जागांसाठी अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) उमेदवार निश्चित केल्याची माहिती आता समोर येत आहे. 

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना राज्यपानियुक्त आमदारांमध्ये संधी देऊ, असे सांगण्यात आले होते. पण मविआचे सरकार कोसळल्याने शिवाजीराव गर्जे (shivajirao Garje) यांची विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा अधुरी राहिली होती. परिणामी त्यांना यावेळी संधी मिळू शकते. तर राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांनी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना, 'विधानपरिषदेवर संधी देऊ' असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राजेश विटेकर यांना विधानपरिषदेची (Vidhanparishad Election 2024) उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही मंगळवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या या  बैठकीत विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेल्या 50 जणांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली होती. यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. यामध्ये संजय सावंत, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता.  यापैकी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. 

विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे (MVA) 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. केवळ 11 व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील उत्सुक आहेत. त्यांचे सर्वपक्षीय संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा याच सर्वपक्षीय संबंधाचा वापर करुन विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. 

कुणाकडे किती संख्याबळ ? 

महायुती

भाजप -103 शिंदे सेना – 37 राष्ट्रवादी (AP) - 39 छोटे पक्ष - 9 अपक्ष - 13 असे एकूण - 201 

मविआ

काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15 राष्ट्रवादी (SP) - 13 शेकाप - 1 अपक्ष - 1 असे एकूण - 67 

 एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ आहेत.

विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.

आणखी वाचा

अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  03 JULY  2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 3 July 2024 :6 AM: ABP MajhaABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीसांचा दबाव झुगारुन नवाब मलिकांना निमंत्रण, अजितदादा गटाच्या बैठकीची जोरदार चर्चा
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Embed widget