Uttam Jankar on Ajit Pawar : "मी सध्या अजित पवार (Ajit Pawar) गटात आहे. मात्र, बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच मी पक्ष सोडणार आहे", असे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले.  वेळापूरमध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील (Mohite Patil) कुटुंबिय 30 वर्षांचे वैर संपवून एकत्र आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तम जानकर (Uttam Jankar) कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, आता त्यांनी मोहिते पाटील कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसू शकतो. 


खासदारकी मोहितेंना, आमदारकी उत्तम जानकरांना 


मोहिते पाटील आणि उत्तम जानकर तब्बल 30 वर्षांचे वैर संपवून एकत्र आले आहेत. जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबियांमध्ये एक समीकरण ठरलं आहे. खासदारकी मोहिते पाटलांना तर आमदारकी उत्तम जानकरांना असा सौदा करण्यात आला आहे. सहा महिन्यापासून धैर्यशील मोहिते पाटील व उत्तम जानकर यांचे एकत्र यायचे ठरले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर  302 नुसार जुना गुन्हा दाखल करण्याच्या व उत्तम जानकर यांचा अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या धमक्या येत आहेत, असा आरोप जानकर यांनी केलाय. 


या मतदार संघाचा आमदार आमच्या पक्षाचा होईल : जयंत पाटील 


जयंत पाटील म्हणाले,  लढायचे असेल तर सरळ लढा. केसेस दाखल करुन आचारसंहितेचा भंग करत आहात. तसे केल्यास तुमचे राज्यात फिरणे अवघड करु. राज्यात मोहिते पाटील आणि जानकर यांनी वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. पवार साहेबांनी चांगले काम केले आहे. माढा सुरक्षित आहे. येथील उमेदवार विजयी घोषित करायला हरकत नाही. 7 उमेदवार आमचे उमेदवार चांगल्या फरकाने येतील. इतर ३ ठिकाणचे रिपोर्ट आले नाहीत. या मतदार संघाचा आमदार आमच्या पक्षाचा होईल.


जानकरांची मनधरणी करण्यास फडणवीसांना अपयश 


भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना आमदारकीचे आश्वासन दिले. त्यांची भेट व्हावी, यासाठी खास विमान बोलावले. मात्र, फडणवीसांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.  उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांच्या युतीमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा फटका बसू शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rahul Shewale on Raj Thackeray : मनसेच्या स्थापनेनंतर म्हणजे 18 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत : राहुल शेवाळे