Rahul Shewale on Raj Thackeray, Shivtirth : "आपणा सर्वांना माहिती आहे की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी गुढीपाडव्याला तशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय राज ठाकरे यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. ही पण माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. एक दुसर माझ भाग्य आहे की, 18 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून 18 वर्षानंतर धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. हे पण मी माझं भाग्य समजतो",असे शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale ) म्हणाले. खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


महायुतीला पाठिंबा देऊन एकप्रकारे प्रचारच केला आहे


राहुल शेवाळे म्हणाले, संदीप देशपांडे आम्ही सर्व सोबत होतो. आमदार सदा सरवणकर, तुकाराम काते यांच्यासोबत आम्ही निवडणुकीबाबत चर्चा केली. मतदारसंघाबाबत चर्चा केली. त्यांनी महत्वाच्या सूचना मला दिल्या आहेत. त्या सूचनांची मी निश्चितपणे अंमलबजावणी करेन. त्यांनी महायुतीला पाठिंबा देऊन एकप्रकारे प्रचारच केला आहे. आम्ही मनसेच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहोत. लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका असणार याची रुपरेषाची आखणार आहोत. 17 मे ला लोकसभेच्या निमित्ताने शिवाजी पार्कचे बुकींग करण्यात आले आहे. महायुतीचे सर्व नेते त्या सभेला उपस्थित असणार आहेत, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. 


महायुतीच्या सर्व पक्षांचा सन्मान राखला जाणार आहे


महायुतीच्या सभांना राज ठाकरे आणि मनसे नेतेही उपस्थित राहतील. पुढील काही निती असेल ती भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते ठरवतील. काल जो प्रकार झाला, तो गैरसमजतीतून झाला. पुढील काळात असं काही होणार नाही. महायुतीच्या सर्व पक्षांचा सन्मान राखला जाणार आहे. शिवसेनेने जागा वाटपाच्या बाबतीत बलिदान दिलेलं नाही. आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. त्यामध्ये शिंदे साहेबांची भूमिका महत्वाची असणार आहे. ते महायुतीचेही प्रमुख आहेत. आम्ही महायुतीचा विजय कसा होईल, याचा विचार केला जात आहे, असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar: स्टेजवर खुर्ची नसल्याने निलेश लंके खाली बसले, लग्नाच्या वाढदिवसाचा बुके कार्यकर्त्यांना देऊन टाकला, शरद पवार राणी लंकेंना म्हणाले....