एक्स्प्लोर

Uttam Jankar on Ajit Pawar: राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या... उत्तम जानकरांची अजित पवारांवर सडकून टीका

Uttam Jankar on Ajit Pawar: राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका, असं म्हणत उत्तम जानकरांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

Uttam Jankar on Ajit Pawar: आगामी विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election 2024) धुरळा राज्यात सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातीव जनतेनं अनेक राजकीय भूकंपांचा सामना केला आहे. अशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) फुटीमुळे कधीकाळी एकत्र असणाऱ्या पक्षातील उमेदवारच आता यंदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत. अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना तुफान टोलेबाजी केली आहे. राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका, असं म्हणत उत्तम जानकरांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर, शरद पवार गटाने आठ जागांवर बाजी मारत विजयी गुलाल उधळला. लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांची शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे. तर काही नेते घरवापसी करत आहेत. यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. 

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली. 

आजही उत्तम जानकर हे अधिकृतपणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत असले तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत बारामतीमध्ये देखील जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं याच जानकर यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी खास विमानाच्या वाऱ्या देखील घडवल्या. मात्र तरीही जानकर यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लोकसभेत राष्ट्रवादीच्या विजयात मोठा हातभार लावला होता. आता पुन्हा अजितदादा यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यावर अस्वस्थ झालेल्या जानकरांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा थेट अजितदादा यांच्यावर निशाणा साधला. त्यांना पक्षात घेतलं तर, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे संकेत उत्तम जानकरांनी दिले आहेत. त्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळणार आहे. 
      
आपण चळवळीतील कार्यकर्ता असून आयुष्यात आजपर्यंत 39 निवडणूक लढवून त्यातील 36 निवडणूक हरलो होतो. मात्र, आपण कधीही निराश झालो नाही किंवा कोणाला घाबरलोही नाही, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना जानकर यांनी अजितदादा यांच्या घरवापसीला कडाडून विरोध केला. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा करताना भाजप जात जात पुढच्या सत्ताधाऱ्यांना राज्यच चालवता येऊ नये, अशी अवस्था बनवत असल्याचा आरोपही केला आहे. यातूनच लाडकी बहीण सारख्या खर्चिक योजना आणल्या जात असून ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना असल्याचा टोलाही यावेळी उत्तम जानकरांनी लगावला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नाचे औषध फक्त शरद पवार यांच्याकडे असून सत्ताबदल झाल्यावर ते निघेल, असाही दावा जानकर यांनी केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget