Elections 2022 Voting : उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर पंजाबमध्ये सर्वच जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता राखण्याचे तर पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता राखण्याचे आव्हान कायम असणार आहे. उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.44% टक्के मतदान झाले आहे. तर पंजाबमध्ये 63.44% टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 


उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशध्ये 403 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये मतदानाचे पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान झाले आहे. आज 59 जागांचा तिसरा टप्पा पार पडत आहे. दरम्यान, 2017 चा विचार केला तर उत्तर प्रदेशमधील या 59 जागांपैकी 49 जागा जिंकल्या होत्या तर समाजवादी पार्टीला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला केवळ एकचा जागा जिंकता आली होती. बहुजन समाज पार्टीला एकाही जागेवर विजय मिलवता आला नव्हता.


पंजाब 


पंजाबमध्ये एकूण विधानसभेच्या 117 जागा आहेत. त्या सर्वच जागांसाठी आज मतदान सुरू आहेआहे. 2017 चा विचार केला तर पंजाबमध्ये काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर शिरोमणी अकाली दर आणि भाजप यांच्या युतीला 18 जागा आणि आम आदमी पार्टीला 20 जागा मिळाल्या होत्या. तर 2 जागा या लोक इंसाफ पार्टीला मिलाल्या होत्या. त्यामुळे आता यावेळी सत्ता टिकवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसला आम आदमी पार्टी, भाजप, शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार टक्कर दिली आहे. याचबरोबर काँग्रेसमधील अंतर्गत कलह देखील या निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर आला आहे. त्याचा देखील काँग्रेसला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.


महत्वाच्या बातम्या