चंदीगड: निवडणुकीत कोण काय शपथ घेईल, कोण काय निश्चय करेल हे सांगता येत नाही हे खरं. आता नवज्योत सिंह सिद्धूची मुलगी, राबिया सिद्धूने असाच निश्चय केला आहे. जोपर्यंत आपले वडील निवडून येत नाहीत तोर्पर्यंत आपण लग्न करणार नाही अशी शपथ तिने घेतली आहे. 


पंजाबची निवडणूक जशी जवळ येत आहे तसं तिथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्व पक्षांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरू केल्या आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी राबिया सिद्धू ही मैदानात उतरली आहे. 


काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंह सिद्धू यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलीचे लग्न करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यावर प्रतिक्रिया देताना राबिया सिद्धू म्हणाली की, ते भावूक झाल्याने तसे बोलले. जोपर्यंत आपले वडील निवडणूक लढवत नाहीत तोपर्यंत आपण लग्न करणार नाही. 


दरम्यान, पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  पंजाबमध्ये कॉंग्रेसची लढत ही  प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार असं दिसतंय. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली होती. 


महत्त्वाच्या बातम्या :