UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यूपी निवडणुकीचा निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या की, ‘राज्याचं नशीब बदलण्यासाठी बसपाची ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ची ‘आयरन सरकार’ बनवण्याची आवश्यकता आहे.
मायावती यांनी ट्वीट करत म्हणाल्या आहेत की, "यूपीच्या नऊ जिल्ह्यांतील 54 विधानसभा जागांसाठी उद्या (सोमवारी) मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात, गरिबी आणि बेरोजगारीमुळे त्रस्त आलेले उपेक्षित लोक आपल्या मतदानाच्या ताकदीतून स्वतःचे आणि राज्याचे नशीब पालटण्याचं काम करू शकतात. यासाठी बसपाची सर्वजन हिताय, सर्वजन सुखायची आयरन सरकार बनवण्याची आवश्यक आहे.''
त्यांनी आपल्या आणखीन एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "विरोधी पक्षांची सर्व प्रकारची वचने आणि आवश्वासाने देऊन अनेकवेळा जनतेची फसणूक केली आहे. हे जगजाहीर आहे.'' त्या म्हणाली आहेत की, या सरकराने लोकांना अच्छे दिन आणणार असल्याचं सागितलं. मात्र यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशच्या लोकांची परिस्थिती अधिक खालावली आहे. म्हणून त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी ट्वीटद्वारे उत्तर प्रदेशच्या जनतेला केलं आहे.
मायावती म्हणाल्या, "विरोधी पक्षांनी पैशाची ताकद, साम, दाम आणि दंड, भेद अशा सर्व प्रकारच्या डावपेचांचा अवलंब करून उत्तर प्रदेशच्या निवडणुका आपल्या बाजूने करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र जनता महागाई, गरिबी, बेरोजगारी, सरकारचा निरंकुश कारभार आणि भटक्या प्राण्यांचा त्रास या आपल्या मूलभूत मुद्द्यांवर कायम आहे.''
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर