UK PM Boris Johnson's India Visit: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) या महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील. जॉन्सन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीला भेट देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.


गेल्या वर्षी पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा दोनदा रद्द करण्यात आला होता. जानेवारीत ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यावेळी देशातील कोरोना संकटामुळे हा दौरा शक्य झाला नाही. यानंतर एप्रिलमध्येही कोरोना संकटामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. G-7 चे अध्यक्ष या नात्याने ब्रिटनने पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले होते, पण कोरोना संकटामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही.


2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती 


मे 2021 मध्ये दोन्ही व्हर्चुअल बैठक झाली होती. ज्यात 2030 च्या रोडमॅपवर चर्चा झाली. यामध्ये आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील ब्रिटन-भारत संबंधनावर (India- UK relations) चर्चा झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पुढील 15 दिवसांत भारत आणि ब्रिटनमध्ये अनेक उच्चस्तरीय कार्यक्रम होणार आहेत. या दोन्ही नेत्यांची भेट गुजरातमध्ये होऊ शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha