Indigo Flight : इंडिगो एअरलाईनच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानातील प्रवाशाच्या फोनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. इंडिगोच्या दिब्रुगड-दिल्ली फ्लाइट दरम्यान गुरुवारी एका प्रवाशाच्या मोबाईल फोनला आग लागली. मात्र क्रू मेंबरच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. कर्मचाऱ्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. विमान वाहतूक नियामक DGCA च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या घटनेत कोणताही प्रवासी किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. फ्लाइट क्रमांक 6E 2037 दिब्रुगडहून दिल्लीला जात असताना एका क्रू मेंबरला प्रवाशाच्या फोनमधून स्पार्क आणि धूर येत असल्याचं दिसलं.
विमानात प्रवाशाच्या फोनला अचानक आग
DGCA अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशाच्या फोनमधून धूर येत असल्याचे दिसल्यावर क्रू मेंबर्सनी अग्निशामक यंत्रणेच्या मदतीने आग विझवली. गुरुवारी दुपारी 12.45 वाजता हे विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. मोबाईलची बॅटरी अचानक गरम झाल्याने ही घटना घडली आहे. क्रू मेंबरच्या योग्य आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठीच्या प्रशिक्षणामुळे त्यांनी परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणली.
कोणीही जखमी नाही
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दिब्रुगडहून दिल्लीला जात होते. त्यानंतर विमानातील एका प्रवाशाच्या मोबाईलमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर क्रू मेंबर्स तात्काळ सक्रिय झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. विमानातील कोणत्याही प्रवाशाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. गुरुवारी दुपारी 12.45 वाजता विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- दिल्लीतील Akshardham Metro Station च्या छतावरुन तरुणीची उडी, उपचारादरम्यान मृत्यू
- South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे 306 हून अधिक लोकांचा मृत्यू
- India Post Recruitment 2022 : भारतील टपाल विभागात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती, आठवी पास करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha