एक्स्प्लोर

Chandrakant Patil: लोकसभेत उद्धव ठाकरेंनी खूप मेहनत घेतली, पण काय मिळवलं? चंद्रकांत पाटलांचा थेट सवाल

Chandrakant Patil News: लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली, पण काय मिळालं, त्यांच्या हाताशी काय लागलं? असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil News) म्हणाले आहेत. 

Chandrakant Patil on Uddhav Thackeray : मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व एक आश्वासक नेतृत्व आहे नरेंद्र मोदी यांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे संपूर्ण जग हळहळलंय, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. तसेच, शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) सरकार पडण्याविषयी वारंवार बोलायचे, पण त्याचा काही फरक पडला नाही, आता विधानसभा तीन महिन्यांवर आलेली आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलं म्हणून काय होणार आहे असं काहीही नाही, असंही ते म्हणालेत. त्याचप्रमाणे, लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली, पण काय मिळालं, त्यांच्या हाताशी काय लागलं? असं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil News) म्हणाले आहेत. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी जास्त मेहनत घेतली : चंद्रकांत पाटील 

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना जास्त यश मिळालं असं वाटतंय. लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काही ना काही आजारपणं असतात, तशी त्यांचीही आजारपणं होती. पण ते खूप फिरले. त्यांना 9 सीट मिळाल्यात, 2019 ला सरकार कंटिन्यू झालं असतं, युती कंटिन्यू झाली असती. त्यांच्या मात्र यंदा 13 आणि आठ सीट्स झाल्या. उद्धव ठाकरेंनी याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? एका बाजूला अल्पसंख्यांकांच्या मतांवर निवडून आलेले असा ठपका बसला."

लोकसभेच्या धड्यावरून खूप काही गोष्टी नीट करता येतील : चंद्रकांत पाटील 

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्यांनं ट्वीट केलं की, हा भगवा विजय नाही, तर हा हिरवा विजय आहे. हे एका बाजूला झालं, पण दुसऱ्या बाजूला सीट्स 18 च्या नऊ झाल्या आहेत. तिसऱ्या बाजूला ते जर एकत्र राहिले असते, तर आज जी वाताहात झाली आहे, ती झाली नसती, त्यामुळे यांच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला पक्का फायदा करून घेतला आहे. शिंदे गट शिवसेनेच्या आमदारांमध्ये जी चर्चा आहे, ती चर्चा मी ऐकलेली नाही. मात्र लोकसभेच्या धड्यावरून खूप काही गोष्टी नीट करता येतील.", असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. 

सर्वसामान्यांना ज्या गोष्टी वाटतात, त्या समजवण्यात आम्ही कमी पडलो : चंद्रकांत पाटील 

"कांद्याचा विषय निवडणुकांवर काही ना काही परिणाम करून गेलेला आहे. यावेळी मात्र कांद्याची निर्यात बंदी उठवली होती. निर्यात बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता. पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. मधली जी साखळी असते ती बऱ्याचदा ठरवते की काय करायचं आणि काय नाही करायचं. निर्यात बंदी उठली पण शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोहोचलं नाही, या निवडणुकीत काही गोष्टींमध्ये लोकांच्या मनात असलेल्या प्रश्न संपवण्यात थोडे कमी पडलो. संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे. मराठा आरक्षण विषयही त्यातला आहे, सर्वसामान्यांना ज्या गोष्टी वाटतात, त्या समजवण्यात आम्ही कमी पडलो.", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget