Ambadas Danve on Uddhav Thackeray : "परिवर्तनाची वेळ आहे. येणाऱ्या काळात इंडिया आघाडीला बहुमत मिळाले तर उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान देखील होतील. याचा सारख्या आनंद होणारा क्षण शिवसैनिकांसाठी कोणताही नसेल. अनेक लोक नकली शिवसेना, नकली संतान असं काहीही बोलले. शिवसेना संपणार म्हणाले. परंतु हिच नकली शिवसेना आणि नकली संतान भारताचे नेतृत्व करेल, अशी स्थिती आहे", असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. ते संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मतमोजणीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना त्यांनी सूचनाही दिल्या. यावेळी महाविकास आघाडीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे देखील उपस्थित होते. 


अंबादास दानवे म्हणाले, मी तीन दिवसांपूर्वी राज्याच्या डीजींना भेटायला गेलो होतो. त्यानंतर तीन अॅडीशनल डीजी आहेत, त्यांच्याशीही मी बोललो. राज्याची धुरा संभाळणारे हे लोक मला म्हणाले की, येणारा काळ तुमचा आहे. हे शिवसेना संपणार म्हणत होते. पण आज सगळे सर्व्हे शिवसेनेली 12 ते 14 जागा दाखवत आहेत. 18 पर्यंत सुद्धा शिवसेनेला जागा मिळू शकतात. गद्दार गेले, आपल्यातील घाण गेली. महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वात आपण काम करुयात, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत 


छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) यावेळी जातीय समीकरण फार महत्त्वाचं ठरलं. याआधीच्या अनेक निवडणुकांत संभाजीनगरात 'खान की बाण' हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. पण यावेळच्या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तेवढाच महत्त्वाचा ठरला. याच कारणामुळे छत्रपती संभाजीनगराच्या निवडणुकीत एकदम अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे काही भागात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती


उमेदवारी जाहीर होताच चंद्रकांत खैरे यांनी पहिल्या दिवसापासून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यामुळेच त्यांनी प्रचारात मुस्लीम मतदारांशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला. त्याचा काही ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसला. कारण काही भागांत मुस्लिमांनी खैरे यांना मतदान केल्याचं दिसलं. मोदींना सत्तेतून हटवायचं असेल तर काँग्रेसला साथ द्यावी लागेल त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्यावे लागेल, असा विचार यामागे होता. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे काही भागात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्याचा परिणाम म्हणून काही लोकांनी खैरे यांना मतदान केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok sabha Election Result 2024: काँग्रेस पक्षासाठी अस्तित्त्वाची लढाई, जाणून घ्या महाराष्ट्रातील 17 उमेदवारांचा निकाल