मुंबई: लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीपैकी कोणाची सरशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, त्याचवेळी गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कामगिरीकडेही सर्वांचे बारीक लक्ष असेल. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात काँग्रेस (Congress) पक्षाची अवस्था उत्तरोत्तर बिकट होताना दिसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, संजय निरुपम , बसवराज पाटील, अर्चना पाटील-चाकूरकर यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला होता.
एकीकडे बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असली तरी इंडिया आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या साथीमुळे काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत पाय रोवून उभा राहिला होता. भाजपच्या प्रचंड रेट्यापुढे काँग्रेस फारसा टिकाव धरणार नाही, असे निवडणुकीपूर्वी वाटत होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने अनेक जागांवर प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान निर्माण केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात एकूण 17 जागा लढवल्या. त्यापैकी कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता आहे.
कोणत्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात
मतदारसंघ | उमेदवाराचे नाव | निकाल |
सोलापूर | प्रणिती शिंदे | विजयी |
कोल्हापूर | शाहू महाराज | विजयी |
प्रतिभा धानोरकर | विजयी | |
गडचिरोली चिमूर | नामदेव किरसान | विजयी |
धुळे | शोभा बच्छाव | विजयी |
उत्तर मध्य मुंबई | वर्षा गायकवाड | विजयी |
उत्तर मुंबई | भूषण पाटील | पराभूत |
भंडारा गोंदिया | प्रशांत पडोळे | विजयी |
नागपूर | विकास ठाकरे | पराभूत |
रामटेक | श्यामकुमार बर्वे | विजयी | ||
अकोला | अभय पाटील | पराभूत | ||
नंदुरबार | गोवाल पाडवी | विजयी | ||
पुणे | रवींद्र धंगेकर | पराभूत | ||
लातूर | शिवाजीराव काळगे | विजयी | ||
नांदेड | वसंतराव चव्हाण | विजयी | ||
अमरावती | बळवंत वानखेडे | विजयी | ||
जालना | कल्याण काळे | विजयी |
आणखी वाचा
कोल्हापूर, माढा अन् बारामतीचा गड कोण सर करणार? महाराष्ट्रातील 10 हायव्होल्टेज मतदारसंघाचा निकाल