Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election 2024) अवघा काही तासांवर आला आहे. अवघ्या देशाचं लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. देशाचा पंतप्रधान कोण? याचा फैसला उद्याच्या निकालानंतर होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 48 मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झालं आहे. 20 मे रोजी मुंबईसह एकूण 13 मतदारसंघातील मतदानानंतर (Voting) राज्यातील निवडणुकांची सांगता झाली. यंदाची राज्याची लोकसभा निवडणूक फार वेगळी ठरली, ती महाराष्ट्रातील राजकीय भूकंपांमुळे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) पडलेल्या अंतर्गत बंडाळीमुळे. शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून थेट पक्षावर दावा ठोकला आणि भाजपच्या साथीनं राज्यात सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक ही शिंदे विरुद्ध ठाकरे झाली, अशाच चर्चा राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्यांमध्येही होत्या.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) यांच्यात कोणाचं पारडं जड राहणार हे पाहता येईल. राज्यात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेतील फुटीमुळे ही लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसाठी (Eknath Shinde) प्रतिष्ठेची ठरली.
Lok Sabha Election Result 2024 Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचा निकाल काय?
मतदारसंघ | उमेदवार (शिवसेना शिंदे गट) | विरोधी पक्षातील उमेदवार | कोण विजयी/पराभूत? (शिंदे गट) |
उत्तर पश्चिम मुंबई | रवींद्र वायकर | अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) | रवींद्र वायकर पराभूत |
दक्षिण मध्य मुंबई | राहुल शेवाळे | अनिल देसाई (ठाकरे गट) | राहुल शेवाळे पराभूत |
दक्षिण मुंबई | यामिनी जाधव | अरविंद सावंत (ठाकरे गट) | यामिनी जाधव पराभूत |
बुलढाणा | प्रतापराव जाधव | नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) | प्रतापराव जाधव विजयी |
यवतमाळ - वाशिम | राजश्री पाटील | संजय देशमुख (ठाकरे गट) | राजश्री पाटील पराभूत |
हिंगोली | बाबूराव कदम | नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) | बाबूराव कदम पराभूत |
औरंगाबाद | संदिपान भुमरे | चंद्रकांत खैरे (ठाकरे गट) | संदिपान भुमरे विजयी |
नाशिक | हेमंत गोडसे | राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) | हेमंत गोडसे पराभूत |
शिर्डी | सदााशिव लोखंडे | भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) | सदााशिव लोखंडे पराभूत |
मावळ | श्रीरंग बारणे | संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) | श्रीरंग बारणे विजयी |
कल्याण | श्रीकांत शिंदे | वैशाली दरेकर (ठाकरे गट) | श्रीकांत शिंदे विजयी |
ठाणे | नरेश म्हस्के | राजन विचारे (ठाकरे गट) | नरेश म्हस्के विजयी |
हातकणंगले | धैर्यशील माने | सत्यजीत पाटील (ठाकरे गट) | धैर्यशील माने विजयी |
रामटेक | राजू पारवे | शामकुमार बर्वे (काँग्रेस) | राजू पारवे पराभूत |
कोल्हापूर | संजय मंडलिक | शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) | संजय मंडलिक पराभूत |
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या होत्या. तर, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला 21 जागा मिळाल्या. त्यामुळे, दोन्ही शिवसेनेपैकी कोणती शिवसेना लोकसभा निवडणुकीत सरस ठरणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. शिंदेंकडे असलेल्या 15 जागांपैकी 13 जागांवर त्यांचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे, त्यांचं पारडं जड होतं. मात्र, शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं निवडणूक प्रचारांमध्ये दिसून आलं. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच, ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना आहे. त्यामुळे, या निवडणुकीतून मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.