(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता शिवसेनेची मालमत्ता कोणाची; श्रीहरी अणे यांनी सांगितला 'अर्थ'
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिंदे यांना पक्षाचं अधीकृत नाव आणि चिन्ह मिळाल्याने ते ठाकरे समर्थक आमदारांवर व्हीप जारी करू शकतात का? याचं उत्तर राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे (Shrihari Aney) यांनी दिलं आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. शिंदे यांना पक्षाचं अधीकृत नाव आणि चिन्ह मिळाल्याने ते ठाकरे समर्थक आमदारांवर व्हीप जारी करू शकतात का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. याचं उत्तर राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे (Shrihari Aney) यांनी दिलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, ''शिवसेनेच्या दोन्हीही गटांनाएकमेकांवरती व्हिप लावता येणार नाही. कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे दोन्हीही पक्ष दोन वेगळे झालेल्या आहेत.'' याबाबत संदर्भात देत म्हणाले की, ''जसा काँग्रेसचा व्हिप राष्ट्रवादीला लागू होत नाही आणि राष्ट्रवादीचा व्हिप काँग्रेससाठी लागू होत नाही त्याप्रमाणे शिंदे गटाचा व्हीप ठाकरे समर्थक आमदारांना लागू होणार नाही.''
Thackeray Group Vs Shinde Group: शिवसेनेची मालमत्ता देखील शिंदे गटाला मिळणार?
शिवसेना (Shiv Sena) नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळालं आहे. तर पक्षाची मालमत्ता (पक्षाचे कार्यालय ) देखील त्यांना मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारलं असताना, ते म्हणाले आहेत की, ''पक्षाची प्रॉपर्टी हा एक वेगळा विषय आहे. जसं शिवसेना भवन आणि इतर प्रॉपर्टी म्हटलं तर ती संस्थेची आहे. त्यामुळे शिंदे गट इथे दावा करू शकत नाही. त्या संस्थेला वाटेल त्याकडे ती प्रॉपर्टी जाऊ शकते.'' शिवसेने पक्षाला मिळालेल्या निधीबद्दल बोलताना अणे म्हणाले, ''पक्षाचा फंड म्हणून आलेला असेल तर त्याच्यावरती शिंदे गटाचा क्लेम राहील. जर पक्षाच्या नावाने फंड आला असेल, तर शिंदे गट तो फंड आमच्याकडे देण्याचा अर्ज करून तो फंड वापरू शकतात. या सर्व गोष्टी कायद्यानुसार त्या त्यावेळी सोडवले जातील. उद्या तुम्ही म्हणाल की, शिंदे गटाकडे पक्ष आहे, कार्यालय त्यांच्याकडे आहे. मात्र त्यामध्ये फर्निचर आणि इतर वस्तु इतर कोणाच्या आहेत, तर ते त्यावर दावा करतील.''
Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह कायमस्वरूपी मिळू शकतं?
ठाकरे गटाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गेलं आहे. त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह तात्पुरती स्वरूपात दिलं होतं. आता हेच चिन्ह त्यांना कायम स्वरूपी मिळू शकता का? याबद्दल बोलताना श्रीहरी अणे म्हणाल की, ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह कायमस्वरूपी मिळू शकतं.
Thackeray Group Vs Shinde Group: निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेल्यावर काय होईल?
याबाबत बोलताना ते म्हणाले, ''सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात आधी विचार करतील किंवा तो खालच्या कोर्टाकडे पाठवतील. परंतु शक्यतो सुप्रीम कोर्ट खालच्या कोर्टाकडे पाठवण्याचा प्रयत्न करते नेहमी.''