एक्स्प्लोर

Uddhav Thackeray visit Raj Thackeray Ganpati: गणपती बाप्पाने ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणलं, उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, दुपारी एकत्र जेवणार

Uddhav Thackeray visit Raj Thackeray Ganpati: उद्धव ठाकरे हे गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आहेत. गणपती बाप्पााने भावांना एकत्र आणलं

Uddhav Thackeray & Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरत असलेले ठाकरे बंधू आज गणेशोत्सवाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ येथे दाखल झाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आहेत. उद्धव ठाकरे हे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणार आहेत. 

यापूर्वी 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray Brotehrs) मनोमिलन झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन महत्त्वाचे आहे. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हेदेखील राज यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू आता मनाने एकत्र आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवतीर्थवरील आजच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

राज ठाकरे हे यापूर्वी दादरच्या शिवाजी पार्कमधील कृष्णकुंज या वास्तूमध्ये राहत होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी आपला मुक्काम शेजारीच नव्याने उभारण्यात आलेल्या शिवतीर्थमध्ये हलवला होता. राज ठाकरे हे कलासक्त असल्याने त्यांनी शिवतीर्थ हे निवासस्थान सुंदर पद्धतीने सजवले आहे. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्याने उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी आले आहेत. या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गट निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

आणखी वाचा

पंचताराकित हाॅटेलपासून, वर्षा बंगला ते शिवतीर्थापर्यंत; वर्षभरात राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना 'इतक्या' वेळेला भेटले

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Police Dogs: आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार; CM देवेंद्र फडणवीसांचा संवेदनशील निर्णय
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mahendra Dalvi: 'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात
'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget