एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: 'एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी', मनसे-शिवसेनेची युती जाहीर; उध्दव ठाकरेंनी युतीच्याच पहिल्या भाषणात सरकारला दिला इशारा

Uddhav Thackeray: आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत, आणि मी मागेच मी सांगितलं एकत्र योतोय तो एकत्र राहण्यासाठी असंही ठाकरेंनी सांगितलं आहे.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एवढं आमचा एकमत झालेला आहे. आज सर्वांचे स्वागत करतो, आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. तर त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे, 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघे इथे बसलेलो आहोत. ठाकरे बंधू... आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापती मधले एक सेनापती, त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका म्हणजे श्रीकांत ठाकरे, अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता, त्याच्या नंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उभे नाचायला लागले आणि त्यावेळी त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्षे पूर्ण होतील, इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की, मुंबईचे लचके तोडायला, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघजण दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मनसूबे आणि आता जर का आपण भांडत राहिलो ते जे काही संघर्ष आणि जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल, असंही उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढ उध्दव ठाकरे म्हणाले की, आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत, आणि मी मागेच मी सांगितलं एकत्र येतोय ते एकत्र राहण्यासाठी, यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने  महाराष्ट्राल मुंबईपासून, मुंबईपासून मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकीय खात्मा करू अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. उत्साह अमाप आहे, मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्र विनंती करतोय, आवाहन करतो आणि एक सूचना सुरात करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसं आज मी मराठी माणसाला सांगतोय की, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे. मराठी माणूस कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी त्याच्या वाटेला कोणी आला तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणून एक प्रकारे उध्दव ठाकरेंनी इशाराच दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget