एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल, तर उखडून फेकू : उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray : वक्फ बोर्डवर तुम्ही गैर मुस्लिम माणूस टाकत असाल तर आमच्या हिंदू मंदिरांवर तुम्ही गैरहिंदू ठेवणार का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

Uddhav Thackeray : फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे, असे करून दाखवा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.     

उद्धव ठाकरे म्हणाले की, एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते. पण, ती 57 वर्ष तरुण ठेवणे हे सोपे नाही. दत्ताजी यांची आठवण करणे गरजेचे आहे. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राने लढवून मिळवली. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. आम्ही दादरला राहत होतो आणि मी लहान होतो. घरी बेल वाजली, दरवाजावर दत्ताजी होते आणि ते म्हणाले मी शिवसेनेत प्रवेश केला आणि नोकरी सोडून आलोय. मी दत्ताजी यांनी साकारलेले संभाजीचे पात्र पाहिले आहे. नाटकात बेबंदशाहीमध्ये त्यांनी शिवसेना आणि कामगार सेना बांधली. 

कामगार सेना शिवसेनेसोबतच असेल

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अरविंदला मी बोललो, राजीनामा द्यावा लागेल. तो बोलला येस सर आणि राजीनामा दिला. केंद्रातला मंत्री राजीनामा देतोय. पण, अरविंदला थांबविण्याचे काम केले नाही. कारण त्यांना कामगारांचे बिल पास करायचे होते. ते केले पण मी मुख्यमंत्री झालो आणि थांबविले तर यांनी माझे सरकार पाडले.  प्रत्येक विभागात तुम्ही कामगार सेना वाढवायची म्हणत आहे, ते करा. पण, त्यांनी जर वेगळी चूल बनवायचे ठरविले तर ते मी होऊ देणार नाही. कामगार सेना ही शिवसेनेसोबतच असेल. कामगार सेनेचे ऑफिस वेगळे खोला. पण, तुम्हाला आठवड्यातून एकदा शाखेत जावे लागेल. 

ही कुठेही एडजस्टमेंट सेना नाही

काही लोक कामगार सेनेत असतात आणि बाहेर पडले तर दुसऱ्या पक्षाचे काम करतात. ज्यांना कामगार कायदे कळतात त्यांनाच पद द्या. तुमच्यात किती जण आहे ज्यांना आजपर्यंत मी काही दिले नाही तरी शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी ते काम करत आहेत. ही कुठेही एडजस्टमेंट सेना नाही. सगळ्यांचा मान राखून नेमणुका करा. तुम्ही माझा जयघोष करतात. माझ्या खुर्चीवर बसून बघा नेमणुका करताना काय होते? वक्फ बोर्डवर तुम्ही गैर मुस्लिम माणूस टाकत असाल तर आमच्या हिंदू मंदिरांवर तुम्ही गैरहिंदू ठेवणार का? वक्फ बोर्ड, मराठी भाषेवरून आपल्यात भांडण लावले. आम्ही मराठी बोलणारे तुमच्यावरून कडवट हिंदू आहोत. पण आपल्याला गुरफटून ठेवले जात आहे. आपल्याला भांडणात गुंतवून यांचे काय चालू आहे बघा. ठाण्यात एका बिल्डरसाठी क्लस्टरचे काम सुरू आहे. अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. 

फडणवीसांना सांगतो, घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करा

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा मतदान करीन.  आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू. हिंदीची सक्ती कशासाठी? मला अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्ती करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना केला आहे. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. काही नतदृष्ट याविरुद्ध कोर्टात गेले. आपले सरकार गद्दारी करून पाडले.  एसंशिने पाडले आणि आता पाय चाटत आहेत. मी सांगतोय इस राज्य मैं रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना होगा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी आले होते ना जोशी की माशी... ते घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

आणखी वाचा 

Raj Thackeray And Uddhav Thackeray: आमचे वाद छोटे, महाराष्ट्र मोठा, आम्ही एकत्र येणं कठीण नाही; उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Embed widget