एक्स्प्लोर

Shivsena : ऑपरेशन टायगरला वेग? ठाकरेंचे सहा खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत, पाठिंब्याचं पत्रही सोबत, एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना

Maharashtra Operation Tiger : एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद तर इतर खासदारांच्या मतदारसंघात भरीव निधी देण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला नऊ पैकी फक्त चारच खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदेही दिल्लीकडे रवाना झाले असून बुधवारी सकाळी ते या खासदारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 

नांदेड विमानतळावरून संध्याकाळी 7.30 वाजता चार्टर्ड विमान दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख याच्यासह सहा खासदार त्यामध्ये असल्याची माहिती आहे.  हे सर्व खासदार हे नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जातंय. 

सहावा खासदार नेमका कोण?

ठाकरेंचे एकूण नऊ खासदार असून त्यापैकी सहा खासदार नॉट रिचेबल असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी ते आपल्या पाठिंब्याचे पत्रही देणार असल्याची माहिती आहे. यापैकी संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटात जाणार असल्याची आधीच चर्चा सुरू होती. मात्र आता त्यांच्यासोबत असलेला सहावा खासदार नेमका कोण याची नेमकी माहिती मिळाली नाही. 

दरम्यान, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे देखील दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदेंना पाठिंबा देणारे सहावे खासदार ते असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्यातही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. त्यात 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाच खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव हे परभणीमध्ये धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील अनुपस्थित होते. 

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

संजय जाधवांना मंत्रिपदाचं आश्वासन? 

परभणीचे खासदार संजय जाधव हे आधीपासून नाराज असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात मोठा निधीही देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याचेवळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही त्यांच्या मतदारसंघात मोठा निधी देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचसोबत 2029 साली त्यांना तिकीट देऊन पुन्हा खासदार करण्याचा शब्दही दिल्याची माहिती आहे. 

उद्धव ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे ओमराजे निंबाळकर यांचेही नाव ऑपरेशन टायगरच्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्या मामांच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याची माहिती आहे. तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाकरेंचे तीन शिलेदारही दिल्लीत, कायदेशीर सल्ला घेणार

दरम्यान, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदार यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीत गेल्याची माहिती आहे. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाले असून ते या सर्व घडामोडींवर कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. 

संजय राऊतांच्या ट्विटने 'ऑपरेशन टायगर'ला पुष्टी

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगरची बातमी नाकारली असली तरी खासदार संजय राऊत यांच्या एका ट्वीटने मात्र त्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे. 'महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे' असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

नागेश पाटील हैदराबाद एअरपोर्टवरून दिल्लीला रवाना

आतापर्यंत नॉट रिचेबल असलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे हैदराबाद एअरपोर्टवरून दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर असं काही होणार नसल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकरांचं नाव असल्याची चर्चा होती. त्यावर प्रतिक्रिया देताना 'आपली सही कुणीही करू शकत नाही' असं ते म्हणाले होते. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget