मुंबई : मोदी आणि शाह (PM  Narendra Modi and Amit Shah) तुळजाभवानीच्या मंदिरात (Tulaja Bhavani Temple) का गेले नाहीत, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. मी काळाराम मंदिरात (Kalaram Temple) जाणार म्हटल्यावर, ते झाडू घेऊन पोहोचले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (PM Narendra Modi) टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा जाहिरनामा (UBT Shiv Sena Manifesto) प्रसिद्ध करताना ते माध्यमांशी बोलत होते.


मोदी-शाह तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत?


उद्धव ठाकरे म्हणाले की, 2014 आणि 2019 ला आम्ही पाठिंबा दिल्यावर मोदी सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम करेल असं वाटलं होतं. पण, आमची फसगत झाली आहे. मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषेबद्दल आणि तुळजाभवानी मातेबद्दल आतस आहे, हे दिसतंय. कारण मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले पण तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचं अजून दिसलेलं नाही.


जीएसटीवरील त्रासदायक अटी हटवू


उद्योगाला आम्ही चांगले दिवस आणू. पर्यावरण पूरक प्रकल्प आणू बारसू, नाणार सारखे पर्यावरणाला हानी पोहचवणारे प्रकल्प हद्द पार करू,  आम्ही लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार देऊ. कर, दहशतवाद हा मुद्दाही महत्वाचा आहे, तो आम्ही थांबवू. ज्या धाडी आणि इतर गोष्टी सुरू आहेत, त्या थांबवू. जीएसटीवरील त्रासदायक अटी आम्ही काढून टाकू, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


केंद्राने पेट्रोल दरातून पैसे कमावले तसे राज्याने कमावले नाही. शेतकऱ्यांची जीएसटीच्या माध्यमातून होणारी पिळवणूक होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


आम्ही गुजरातचं काही ओरबाडून घेणार नाही


मोदी सरकार हे महाविकास आघाडीला त्यावेळी काहीही मदत करत नव्हतं. आघाडीचं सरकार आल्यानंतर जो काही खड्डा पाडलेला आहे, तो आम्ही भरून काढू. आम्ही गुजरातचं काही ओरबाडून घेणार नाही. प्रत्येक राज्याचा आदर ठेवून त्यांना जे हवं ते देऊच, मात्र महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध करू, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करू, प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आणू, अनेक जिल्ह्यात औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले ते होणार नाही, अशी यंत्रणा उभारू, अशी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.




 


महत्वाच्या इतर बातम्या :


त्यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून; फडणवीसांनी डागली तोफ