कल्याण : आरशामध्ये पाहिलं की, आपली लायकी, आपली औकात काय हे कळेल, असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आणि आमच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत. पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो, असं वक्तव्य करतो. आपल्या लायकीप्रमाणे आपण बोललं पाहिजे, लायकी नसताना आपण ज्यांच्यावर बोलतो ते जनता बघत असते. 20 तारखेला जनताच त्यांना उत्तर देईल, तुमचं योगदान काय, तुमची पात्रता काय, तुमची लायकी काय? असा सवाल करत श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आपली औकात काय हे कळेल
आरशामध्ये पाहिलं की, आपली पात्रता, आपली लायकी, आपली औकात काय हे कळेल, अशी घणाघाती टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील प्रतिष्ठित नागरिकांचे भेटीगाठी घेत आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर दिघे साहेबांचे संस्कार
यांच्यावरती असे-कसे संस्कार केले. ज्यांच्या तोंडी शिव्या शाप आहे, असे शब्द मी बोलूही शकत नाही. आमच्यावर बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि आमच्या आईवडिलांचे संस्कार आहेत. आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलं आहे, वाईट बोलयला शिकवलं नाही. ज्यांनी त्यांना हे बोलायला शिकवलं, त्यांना येत्या 20 तारखेला आणि 4 जूनला निकालाच्या दिवशी जनता उत्तर देईल.
आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे
आपली लायकी काय, आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे, आपली लायकी फोनवर बोलायची आहे, त्यावरच बोललं पाहिजे. लायकी नसताना, आपण ज्यांच्यावर बोलतो, हे जनता बघत असते, तुमची पात्रता काय, तुमचं योगदान काय, तुमची लायकी काय. त्यामुळे आरशामध्ये पाहिलं की, आपली पात्रता, आपली लायकी, आपली औकात कळेल, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :