एक्स्प्लोर

Uday Samant on Operation Tiger: सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच उदय सामंतांच मोठं वक्तव्य

सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, असं म्हणत 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

Uday Samant on Operation Tiger: दिल्लीमध्ये झालेल्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) 6 खासदार फुटल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या मोठ्या राजकीय भूकंपावर सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच  शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठं वक्तव्य करत एकंदरीत शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीबाबत भाष्य केलं आहे. सत्तेत वाटा वाढला की केंद्रात वाढीव मंत्रीपदही मिळणार, असं म्हणत 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होताच उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. (Uday Samant Coffee With Kaushik) 

Uday Samant on Operation Tigerऑपरेशन टायगरचे शिल्पकार इतर कुणी नाही, तर.....

ऑपरेशन टायगर नक्कीच यशस्वी होईल. शिंदेंच्या नेतृत्वावर सगळ्याचा विश्वास आहे. काल ठाकरेंचे खासदार पोहोचले नाहीत म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी आहे. आधी कोथळ्याची भाषा होती. आता तुडवा आहे. पण, ही भाषा चालत नाहीत. खासदार दिल्लीतच आहेत. असेही मंत्री उदय सामंत म्हणाले. ऑपरेशन टायगरचे शिल्पकार इतर कुणी नाही. तर ते सहा खासदारच आहेत आणि लवकरच घोषणा होणार आहे. त्यात अनेक बाबी लवकरच पुढे येणार आहे.

Uday Samant : कोथळा-तुडवा वगैरे कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढण्यासाठी ठिक, पण याचा काहीही फायदा नाही

खासदारांच्या सह्या नाहीत, वगैरे या वावड्या आहेत. पत्रकारांसमोर शिवीगाळ केली, पत्रकारांनाही सुपारी वगैरे बोलतात. अशांवर बोलणं चुकीचं आहे. कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढण्यासाठी कोथळा-तुडवा वगैरे ठिक. पण याचा काहीही फायदा नाही. 2022 साली शिंदेंनी जेव्हा पुढाकार घेतला. तेव्हा आम्हाला दिलेले शब्द कधीही पुर्ण झाले नाही. एकनाथ शिंदे जेव्हा गेले, तेव्हा मी पक्षप्रमुखांना विनंती करत होतो की परत आणू शिंदे साहेबांना. नॅचरल अलायन्सकडे जावू. पण, काँग्रेसची साथ सोडण्याची तयारी नव्हती. शिवाय, पक्षप्रमुखांना कुणी तरी चुकीचं ब्रिफिंग दिलं. आम्ही पहिले तीन दिवस प्रयत्न केले. जेव्हा एकनाथ शिंदेंना मिलिंद नार्वेकर भेटायला आले. तेव्हीही शिंदेंची भूमिका होती. पण पक्षप्रमुखांनी ऐकलं नाही. असेही मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

Uday Samant : काँग्रेस-उबाठाचे नगरसेवक पक्षात येतायेत, पक्षप्रवेश सुरुच राहणार

आता जे सहा खासदार म्हणजे जनमतांचा अपमान म्हणणाऱ्यांनी 2019 साली काय केल? तेव्हा महायुतीला बहुतम मिळालं होतं. पण, तेव्हा काँग्रेससोबत जाणं काय होतं? ऑपरेशन टायगर हे नावं कसं आले माहिती नाही. पण ही प्रक्रिया निरंतर सुरु आहे. उद्या-परवा काँग्रेस-उबाठाचे नगरसेवक पक्षात येतायेत. पक्षप्रवेश सुरुच राहणार आहे. 2029 साली आम्हाला महायुतीतच लढायचं. पक्ष वाढवण्याचा काम सगळे पक्ष करतायेत. जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आमचे असावेत म्हणून आमचे प्रयत्न असतात. आताच ऑपरेशन टायगर काही संसदेतील आकडा वाढवून, महिला आरक्षण विधेयकासाठीच आहे असं नाही. पक्ष फुटतातयेत कारण त्यांचा नेतृत्वावर विश्वास उरला नाहीय.. जे नेतृत्व लोकप्रतिनिधींसोबत उभं राहत नाही. त्यांच्या पक्षांमध्ये फूट पक्की आहे.

Uday Samant : फोडाफोडीचं राजकारण सुरुच राहणार का?

फोडाफोडीचं राजकारण सुरुच राहणार का? असं विचलं असता उदय सामंत म्हणाले, ज्यांना स्वतांचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल ते पक्षांतरं करतात. २०१९ लाही हेच झालं. २०२२ ला आम्ही उठाव केला. तेव्हा आमच्याविरोधात भावना असेल, असा प्रचार केला. पण, 2024ला आम्हाला मतदारांनी भरभरून दिलं. म्हणजेच शिवसैनिकांची भावना आमच्यासोबत आली. असेही उदय सामंत म्हणाले.

Uday Samant : खासदारांच्या प्रवेशानंतर मोठा भाऊ-छोटा भाऊ असा वाद रंगणार का?

खासदारांच्या प्रवेशानंतर मोठा भाऊ-छोटा भाऊ असा वाद रंगणार का? असा प्रश्न विचला असता उदय सामंत म्हणाले, फडणवीस आणि शिंदेसाहेब दोघेही प्रचंड मॅच्युअर नेते आहेत. दोघांचं समन्वय अत्यंत चांगलं आहे. याचा त्यामुळे खासदार वाढले तरी काही फार फरक पडणार नाही. २०२९ सालीही आम्ही महायुतीतच लढणार. महायुतीत समन्वय आहे. तर शिंदेसाहेब आणि दरे दौऱ्याचं काय? असं विचारलं असता सामंत म्हणाले कि, एकनाथ शिंदे कधीच नाराज होवून काम करत नाही. असाच देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव आहे. आणि दरे दौऱ्यामागे त्यांचं भावनिक कारण आहे. उबाठाच्या नेत्यांनी सुपारी घेतलीय, म्हणून ते कायम हेच बोलतात. असेही उदय सामंत म्हणाले.

ऑपरेशन टायगरचं टायमिंग महिला आरक्षण विधेयकाशी जोडलं जातंय का? असा प्रश्न केला असता उदय सामंत म्हणाले, असं काहीही नाही. हा फक्त योगायोग आहे. खासदार वाढले तर श्रीकांत शिंदे केंद्रीय कॅबिनेटमध्ये दिसणार का? याव बोलताना सावंत म्हणाले कि, मागेही संधी होती. तेव्हाही श्रीकांत शिंदेंनी पुढाकार घेतला. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली. तेव्हा सच्चा शिवसैनिकच मंत्री व्हायला हवं म्हणून त्यांनी जाधवांचंच नाव सुचवलं. सत्तेत वाटा वाढला की. केंद्रात नक्कीच वाढीव मंत्रि‍पदाची मागणी होणार. असेही ते म्हणाले.

दरम्यान, २०२२ च्या उठावावेळी केलेल्या काही चुका नक्कीच टाळल्या. फोन सुरु ठेवले. कनेक्ट तोडला नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांला कायम वाटतं की आपल्या नेत्याला सर्वोच्चपद मिळावं. नेता, कार्यकर्ता म्हणून मागणी चुकीची नाही. पण, खेळ आकड्याचा आहे. आणि साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही मित्रपक्षाचं खच्चीकरण करण्यासाठी कधीही नसते. संकटमोचक वगैरे ठिकंय. पण, पक्षासाठी काम करणं हीच भावना आहे. जबाबदारी आली की पार पडणं हेच करतो आम्ही. असेही ते म्हणाले.

 

राज ठाकरेंना भेटलो की नक्कीच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मनसेच्या अनेक नेत्यांशी संपर्कात होतो. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी सोबत यावं, ही अपेक्षा होती. काही गोष्टींमुळे ते झालं नाही. पण, मनसे-शिवसेनेबरोबर आली तर आनंद होईलच. ताशा चर्चाही झाल्या होत्या. हिंदीसक्तीवरुन उबाठाच्या नेत्यांनी राज ठाकरेंचा गैरसमज करुन दिला. खरंतर, हिंदीसक्ती या सरकारनं केली नाही. तर ती ठाकरेंनीच केली होती. आम्ही पर्यायी भाषा म्हणून विचार होता. पण, या निमित्तानं ठाकरे परिवार एकत्र आले. त्याचा आनंदच आहे. पण, राज ठाकरेंना या संपूर्ण गोष्टीवरुन गैरसमज करुन दिला. अजितदादांचं जाणं एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत भावनिक होतं. ज्या मंत्र्‍यांनी वक्तव्य केली. पण, असं काहीही नव्हतं की आमच्याकडून कुणी सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीचा विरोध केला. असेही ते म्हणाले.

आज ते सहा खासदार मंचावर दिसले तर आनंदच होईल.

गुणरत्न सदावर्ते - नाशिकची एक जागा आहे. तिथं एमआयडीसीची जागा आहे. तिथं अनधिकृत बांधकामांमध्ये काही पाडकामं झाली त्यात एक बौद्धविहार आहे. त्यानंतरच्या कारवाईवरुन सदावर्तेंनी माझ्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. पण, त्यांचा गैरसमज झाला. नाशकात मी आंदोलनकर्त्यांना भेटलो, त्यांनाही सदावर्तेचं मताशी समहत नाही. सदावर्तेंना कुणी तरी चुकीची माहिती दिलीय. लवकरच भेट होईल आमची. मी त्याचा गैरसमज दूर करेन. संजय राऊतांनी चार वर्ष आम्हाला झोडून काढलं. पण, जेव्हा ते आजारी होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्यांना फोन केला. त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. आज ते सहा खासदार मंचावर दिसले तर आनंदच होईल. असेही उदय सामंत म्हणाले

 

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Embed widget