शिंदे गटाचे दोन शिलेदार जरांगेंच्या भेटीला, उदय सामंत-संदीपान भुमरेंची बंद दाराआड चर्चा, 23 एप्रिलला मुख्यमंत्र्यांना भेटणार, कारण काय?
Uday Samant Meets Manoj Jarange: दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jalna : उद्योगमंत्री उदय सामंत हे आज बीड दौऱ्यावर होते .छत्रपती संभाजीनगरकडे जाताना वाटेत अचानक त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange)यांची भेट घेतली आहे .येत्या 23 तारखेला मनोज जरांगे यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलीय .पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मागच्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत .मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना दिलेल्या आश्वासनाची मुदत आता संपत आहे .दरम्यान सरकारने मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशाराही जरंगे पाटलांनी दिला आहे . (Jalna)
दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतानी त्यांच्याकडे असलेले दहा-पंधरा आमदार व्यवस्थित सांभाळावे अशी तिरकस टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे .
मनोज जरांगे यांच्याशी काय झाली चर्चा?
येत्या 23 तारखेला मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चर्चा करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे .आज बीड दौऱ्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना मंत्री उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी पैठण फाट्याजवळील छत्रपती भवन येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली .सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत .मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी केलेलं उपोषण सोडताना सरकारनं मनोज रंगे यांना आश्वासन दिलं होतं मात्र आता आश्वासनाची मुदत संपत आहे .त्याआधी मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे .23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन मनोज जरांगे यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करणार असल्याचे ते म्हणालेत .सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिलला संपत आहे .त्यामुळे सरकारने मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय . कुणीही नाराज असू द्या माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावरच चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले .मराठा समाजाचे तीनही गॅजेटीयर लागू करा .कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या .कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करा अशा मागण्या जरांगेंनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केले आहेत .
संजय राऊतांना मोठं करायचं नाही :उदय सामंत यांची टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं .यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही जाहीरपणे भेटलो होतो .संजय राऊतांनी शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही .त्यांच्याकडे असलेले दहा-पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे .संजय राऊत यांच्यावर टीका करून आम्हाला त्यांना मोठं करायचं नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे .
हेही वाचा:























