एक्स्प्लोर

अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही, उलट भाजपची मतं वाढली; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मांडलं अर्थमॅटीक

400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपने महायुतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समावेश करुन घेतला होता. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांत महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही भाजप नेत्यांनी निवडणुकीत केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) गरज नसताना, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सोबत घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आर्गनायजर या मासिकातून भाजपवर टीका करण्यात आली होती. भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळेच नुकसान झाल्याचंही या मासिकातील लेखातून म्हटले होते. आता, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ  240  जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे. त्याच संदर्भाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अजित पवार यांच्यामुळे आमची मतं वाढल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.  

अजित पवारांना घेऊन भाजपचं कोणतही नुकसान झालेलं नाही. याउलट 2019 च्या तुलनेत भाजपची मतं वाढली आहेत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र, 2019 च्या तुलनेत जागा कमी झाल्या हे सत्य आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र, जिंकलेल्या असतील तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. 

मनसेबाबत भूमिका स्पष्ट

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता. इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे, चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. 

सुनेत्रा पवारांना महायुतीचं समर्थन

सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादीची जागा आहे. महायुतीमधून त्यांना सगळ्यांचं समर्थन आहे. मात्र, महायुतीमधून हा नाही गेला, तो नाही गेला याला काही अर्थ नाही असेही बावनकुळे यांनी म्हटले.

संघाच्या दाव्यावर छगन भुजबळांनी काय म्हटलं

अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अशी टीका संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकातून करण्यात आली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, उत्तर देताना होय अशी कबुलीच भुजबळ यांनी दिली. ''त्यांनी अनेकांनी टीका केलेली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोकं घेतल्यामुळेही टीका केलीय. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले आहेत, मिलिंद देवरा घेतले आहेत, त्यांना राज्यसभेवरही पाठवलंय. आम्हाला देखील सोबत घेतलंय, ते म्हणतात ते एकंदरीत बरोबर आहे,'' असं आश्चर्यकारक उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं. तसेच, पण मला त्यांना असं म्हणायचंय, तुम्ही हे महाराष्ट्रातलं सांगता. मग, भारतातील इतर ठिकाणी काय झालंय, इतर ठिकाणीही सेटबॅक बसलेला आहे. त्यामुळे, नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना सोबत घेऊन आघाडी करावी लागली, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
Embed widget