Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut on Thackeray 2 Movie Script : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे 2 चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
![Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा Thackeray 2 Movie script taken by ED Sanjay Raut s big statement Maharashtra politics marathi news Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/10/3dfe02b8558d5b78c78653cf908961fc1731205714978322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut on Thackeray 2 Movie : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक उमेदवार जीव ओतून प्रचार करताना दिसत आहेत. मुलाखती, रॅली, जाहीर सभांच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार प्रचार करत आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट 2019 मध्ये आला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात
ठाकरे या 2019 मध्ये आलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप पाडली. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल विचारण्यात आलं असता, संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीवाले घेऊन गेले, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. एकीकडे राजकारणावर आधारित चित्रपटांचं वारं पाहता ठाकरे चित्रपटाची चर्चाही अनेकवेळा रंगते.
संजय राऊतांचा मोठा खुलासा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची, तर अमृता राव हिने मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकरली होती. ठाकरे 2 चित्रपटाची चर्चा अनेकदा पाहायला मिळते, पण याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. यातच आता संजय राऊत यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे 2 चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
ठाकरे चित्रपटाच्या सीक्वेलबाबत संजय राऊत म्हणाले की, "धर्मवीर 2 चित्रपट आला आणि गेलाही. येक नंबर चित्रपटसुद्धा कधी आला आणि कधी केला, काही कळलंच नाही. ठाकरे 2 चित्रपटाचं स्क्रिप्ट तयार आहे, स्क्रिप्ट तयार होतं, पण माझ्या घरावर ईडीची धाड पडली आणि स्क्रिप्ट ईडीवाले घेऊन गेले. त्यांना वाटलं असेल, शिवसेनेच्या बॅलन्सशीट आहेत. स्क्रिप्ट जाड पुस्तकासारखं होतं. त्यावरती ठाकरे लिहिलं होतं. ती आमची संपत्ती होती. मी वारंवार त्यांना कळवतोय, कोर्टात जातोय की, माझी स्क्रिप्ट मला परत द्या".
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chhaava New Release Date : 'पुष्पा 2'मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलली, निर्मात्यांसमोर नवीन तारीख शोधण्याचा मोठा पेच
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)