Arvind Kejriwal on Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक आणि तोडफोडवरून आता राजकारण सुरू झाले आहे. चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील दंगलीचा निषेध केला, तर दुसरीकडे सुरक्षेच्या जबाबदारीवरून केंद्राकडे बोट दाखवलं आहे. तर भाजपने केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे.
दिल्लीतील परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्रावर टाकत दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटलंय. केजरीवाल म्हणाले की, 'दिल्लीतील यंत्रणा, पोलीस यांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे.'
याआधी अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, 'दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व जनतेला शांतता राखण्याचे आवाहन आहे.'
दरम्यान, दिल्लीचे भाजप प्रदेश सरचिटणीस कुलजित वहल यांनी केजरीवालांवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, 'या गोंधळामागे केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे. त्यांनी दिल्लीतील परिस्थिती बिघडवली. याला केजरीवाल जबाबदार आहेत.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
- Jahangirpuri Violence : दिल्लीच्या जहांगीरपुरीतील गोंधळानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट, पोलीस प्रशासनाला 'या' सूचना
- MoD Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 'या' पदांवर भरती, 50 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना करता येणार अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha