Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. याच्याच विरोधात आज हिंदू संघटनांनी रथयात्रा यात्रा काढली आहे. या रथयात्रेत अनेक नागरिक तलवार काठ्या घेऊन सहभागी झाले आहेत. दिल्लीतील विकासनगर परिसरात हिंदू संघटनांकडून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

  


लहान मुलांच्या हातात ही तलवारी 


बजरंग दलाकडून काढण्यात आलेल्या या रथयात्रेत अनेक लहान मुले देखील सहभागी झाले होते. यामधील बऱ्याच लहान मुलांच्या हातात ही तलवारी आणि काठ्या असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी या रथयात्रेत सामील झालेल्या तरुणांना तुम्ही तलवार घेऊन का आलात, असं विचारलं असता ते म्हणाले, ''लढाई झालीच तर आम्ही काय करणार, म्हणून आमच्या सुरक्षेसाठी आम्ही तलवार घेऊन आलो आहोत.''


10 राज्यात हिंसाचाराच्या घटना


रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान देशभरात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.  महाराष्ट्रात मानखुर्दमध्ये दोन गटात वाद झाला आणि एका गटानं गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक झाली. अनेक दुकानांना लक्ष्य करण्यात आलं, गाड्या जाळण्यात आल्या. मध्यप्रदेशातल्या दोन जिल्ह्यांमध्येही लोकांच्या धार्मिक भावना दुखवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. इथेही मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली आणि दोन गट आपापसात भिडले. पश्चिम बंगालमध्ये हावडा आणि बाकुरामध्ये झालेल्या दंग्यांमध्ये अनेक लोक जखमी झाले. याशिवाय राजस्थान, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, गोवा,  बिहार, आणि छत्तीसगड ही रामनवमीदिवशी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झालेत.


हिंसाचाराच्या घटनेवर पंतप्रधान मोदी गप्प का?


देशभरात एवढ्या हिंसाचाराचा घटना गेल्या सात दिवसात घडूनही पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल देशातल्या 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विचारलाय. हिंसक घटनांमधील संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त निवेदनाद्वारे केली. आता देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे मोदी सरकार काय भूमिका घेणार? हे पाहावं लागणार.


महत्त्वाच्या इतर बातम्या :