Supriya Sule : निष्ठावंतांची भाजपमध्येच वंचना, बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटं तुपात; पंकजा मुंडेंवरील कारवाईवरुन सुप्रिया सुळेचं ट्वीट
Supriya Sule On Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावरील कारवाईवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या निष्ठावंतांची भाजपमध्येच वंचना सुरु असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटं तुपात आहेत, असं त्यांनी म्हटलं.
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. 'अपनों पे सितम,गैरों पे करम' अशी भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांची स्थिती आहे. भाजपच्या निष्ठावंतांची भाजपमध्येच वंचना सुरु असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटं तुपात आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात देखील छापेमारीची कारवाई केली होती.
'अपनों पे सितम,गैरों पे करम'
या कारवाईवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या लिहितात की, "जुन्या हिंदी सिनेमातील 'अपनों पे सितम,गैरों पे करम' या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे दिले पाहिजे.
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही.
नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे."
जुन्या हिंदी सिनेमातील 'अपनों पे सितम,गैरों पे करम' या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 25, 2023
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या…
संघर्षातून मार्ग काढेन, कारवाईनंतर पंकजा मुंडे आक्रमक
दरम्यान या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या राजकारणातून आणि संघर्षातून मार्ग काढेन, चुकीच्या गोष्टी करणार नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण लोकसाठी राजकारण करत आहे आणि ते करत राहणार असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा
Supriya Sule : राज ठाकरेंचं मनापासून कौतुक, कारण.... : सुप्रिया सुळे