Supriya Sule Net Worth : खासदार सुप्रिया सुळे कोट्यवधींच्या मालकीन आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार असा थेट सामना होणार आहे. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून (supriya sule Election Affidavit) त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडील एकूण स्थूल मालमत्ता 38 कोटी रुपये इतकी आहे. त्यांचं पती सदानंद सुळे यांची संपत्ती एक अब्ज 14 कोटी इतकी आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणतीही कार, विमान नाही. 


सुप्रिया सुळे यांच्यावर 55 लाखांचं कर्ज - 


खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातल्या महितीनुसार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून 55  लाख रुपये उधार घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचं एकूण 55 लाखांचं कर्ज आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. अर्ज भरताना उमेदवाराची सांपत्तिक स्थितीही नमूद करावी लागते. प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर 55 लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे. सुळेंनी पार्थ पवार यांच्याकडून २२ लाख रूपये कर्ज घेतलंय तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाखांचं कर्ज घेतलंय. याशिवाय सुप्रिया सुळे यांची 142 कोटींची मालमत्ता आहे अशी माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना यावर्षी शेतीतून शून्य उत्पन्न मिळालंय.


सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे.. गाड्या, सोनं, चांदी, जमीन याबाबतचा तपशील प्रतिज्ञापत्रातून समोर आलाय. पाहूयात सुळे कुटुंबाकडे किती संपत्ती आहे.. 


2022-2023 मध्ये आयकर विवरणपत्रामध्ये दर्शवण्यात आलेले एकूण उत्पन्न - 


सुप्रिया सुळे - 1  कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये


सदानंद सुळे - 3 कोटी 90 लाख 02 हजार 220


रोख रक्कम 


सुप्रिया सुळे - 42 हजार 500


सदानंद सुळे -  56 हजार 200


बँक खात्यातील ठेवी - 


सुप्रिया सुळे - 11 कोटी 83 लाख 29 हजार 195


सदानंद सुळे - 2 कोटी 57 लाख 74 हजार 150


शेअर्समधील गुंतवणूक -


सुप्रिया सुळे - 16 कोटी 44 लाख 24 हजार 140


सदानंद सुळे - 33 कोटी 57 लाख 58 हजार 962



राष्ट्रीय बचत योजना - 


सुप्रिया सुळे - 7 लाख 13 हजार 500


सदानंद सुळे -  16 लाख 34 हजार 030 


कर्ज म्हणून देण्यात आलेली रक्कम - 


सुप्रिया सुळे - 3 कोटी 50 लाख 86 हजार 080 


सदानंद सुळे -  60 कोटी 8 लाख 71 हजार 253 



सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे कोणतेही वाहन, जहाज, मोटार नाही..


सोनं - 


सुप्रिया सुळे - 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचं सोनं


सदानंद सुळे - 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपयांचं सोनं


चांदी - 


सुप्रिया सुळे - 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदी


सदानंद सुळे -  17 लाख 62 हजार 72 रुपयांची चांदी


हिऱ्याच्या मौल्यवान वस्तू - 


सुप्रिया सुळे - एक कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये


सदानंद सुळे -  एक कोटी 62 लाख 74 हजार 253 रुपये


एकूण स्थूल मूल्य - 


सुप्रिया सुळे - 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये


सदानंद सुळे - एक अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये


शेतजमीन बाजरमूल्य


सुप्रिया सुळे - 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये


सदानंद सुळे -  4 कोटी 66 लाख 26 हजार 094 रुपये



सुप्रिया सुळे यांच्यावर कुणाचं किती कर्ज - 


पार्थ पवार - 20 लाख रुपये
सुनेत्रा पवार 35 लाख रुपये


-----------------------


जंगम मालमत्ता (एकूण मुल्य)


सुप्रिया सुळे - 38 कोटी 06 लाख 48 हजार 431 रुपये


सदानंद सुळे - 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये


स्थावर मालमत्ता - 


सुप्रिया सुळे - 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये


सदानंद सुळे -  4 कोटी 66 लाख 26 हजार 94 रुपये


आणखी वाचा :


Sunetra Pawar Property : अजित पवारांपेक्षा श्रीमंत असलेल्या सुनेत्रा पवारांची संपत्ती किती? बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर