पुणे : केवळ राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha Election) आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सुनेत्रा पवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून (Sunetra Pawar Election Affidavit) त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावे असलेली संपत्ती ही अजित पवारांच्या संपत्तीहून जास्त असल्याचं दिसून येतंय. 


सुनेत्रा पवारांकडे एकूण स्थूल मूल्य हे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये इतकं आहे. 


बँकेत कोट्यवधींच्या ठेवी (Sunetra Pawar Bank Deposits) 


सुनेत्रा पवार यांच्या हातातील रोख रक्कम ही 3 लाख 36 हजार 450 इतकी आहे. तर त्यांच्या बँकेतील ठेवीची एकूण रक्कम ही 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपये इतकी आहे. तर अजित पवारांच्या बँकेतील ठेवी या 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 इतकी आहे. 


सुनेत्रा पवारांनी वेगवेगळ्या शेअर्समध्ये 15 लाख 79 हजार 610 इतकी रक्कम गुंतवली आहे. तर बचत योजनांमध्ये 56 लाख 76 हजार 877 रुपये गुंतवले आहेत. तर 6 कोटी 05 लाख 18 हजार 116 रुपयांचं व्याजाचे मूल्य आहे. 


सुनेत्रा पवारांकडे 34 लाख 39 हजार 569 रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिणे आहेत. त्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे. तर त्यांच्याकडे 10 लाख 70 हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत. त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. 


एकूण स्थावर मालमत्ता किती? (Sunetra Pawar Bank Property) 


सुनेत्रा पवारांकडे 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये शेतजमीन आणि इतर प्रकारच्या जमीनीचा समावेश होतो. तर अजित पवारांच्या नावे 37 कोटी 15 लाख 70 हजार 029 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


सुनेत्रा पवारांच्या नावे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपयांची जंगम मालमत्ता असून अजित पवारांच्या नावे ती 13 कोटी 25 लाख 06 हजार 033 रुपये इतकी आहे.  


सुनेत्रा पवारांवर किती कर्ज (Sunetra Pawar Bank Loan)


सुनेत्रा पवार यांच्यावर 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपयांचं कर्ज आहे. तर अजित पवारांवर 4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपयांचं कर्ज आहे. 


सुनेत्रा पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, तर अजित पवार यांच्यावर एकूण दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रकात देण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा :