नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर तुफान हल्ला चढवला. "आयुष्यभर खोटं बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. तर रोहित पवारांनी बेलगाम आरोप करुन सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये", असं तटकरे म्हणाले. नागपुरात ते एबीपी माझाशी बोलत होते. अजित पवारांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी दिलेलं आपल्या सहीचं पत्र चोरल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यालाही तटकरेंनी उत्तर दिलं. 


सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नका (Sunil Tatkare on Rohit Pawar)


सुनील तटकरे म्हणाले, "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेनंतर, रोहित पवार यांनी यात्रा काढली. राहुल गांधींपेक्षा त्यांची यात्रा मोठी होती असं त्यांना वाटतं. त्यामाध्यमातुन त्यांना मिळालेला आनंद नैराश्यच्या माध्यमातून त्यांना झाकता येतं नाही. त्यामुळं अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात येतं आहेत. बेलागम आरोप करण्यात येत आहेत. रोहित पवारांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये"


जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल (Sunil Tatkare on Jitendra Awhad)


अजित पवार यांना त्यांच्या गुणवत्तेवर संधी मिळाली आहे. पहिली त्यांनी  लोकसभा निवडणूक लढलेली होती. त्यानंतर त्यांना प्रत्येकवेळी मताधिक्य मिळालं आहे. आज 43 आमदार बाहेर पडले, कारण अजित पवार यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे म्हणूनच. आमदार यांनी जे पत्र दिलं होतं ते विधीमंडळ नेता निवडीसाठी दिली होते, असं सुनील तटकरे म्हणाले. 


अजित पवार यांनी कायम स्वत:चं नाव समोर केलं. आयुष्यभर खोटं बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सह्या केल्या होत्या. सर्व काही हातून गेलं की असे बेलगाम दावे केले जातात, असा हल्लाबोल तटकरेंनी केला. 


भाजपसोबत जाण्यासाठी सर्वांच्या सह्या


भाजपसोबत जाण्याबरोबरच जितेंद्र आव्हाड ज्या पत्राचा उल्लेख करत आहेत, त्या पत्रबाबात मला माहिती नाही. भाजपसोबत सत्तेत सहभगी होण्यासाठी सगळ्यांनी सह्या केल्या होत्या, असं तटकरे म्हणाले. 


आव्हाडांना विरोधी पक्षनेतेपद हवं होतं


जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते व्हायचं होतं. मात्र त्यासाठी गुणवत्ता लागते. शरद पवार यांची राजकारणातील 60 वर्षांची तपश्चर्यामधून हे माहिती झालं आहे की कुणाला संधी द्यायची. मी लायक हा शब्द वापरणार नाही. त्यासाठी गुणवत्ता हवी असते, असा घणाघात तटकरेंनी आव्हाडांवर केला.  


Sunil Tatkare on Jitendra Awhad : सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?



 


संबंधित बातम्या