मुंबई: ज्यांनी पत्र चोरलं अशी अजित पवारांवर टीका केली त्या रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या पत्रावर तीन वेळा सह्या केल्या असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला. सुनील शेळके यांनी त्यासंबंधित तीन तारखाही जाहीर केल्या. 22 जून, 2 जून आणि त्याच दिवशी म्हणजे 2 जुलै रोजी अशा तीन पत्रांवर रोहित पवारांनी सह्या केल्याचा दावा सुनील शेळके यांनी केला. 


अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, राज्यात स्वयंघोषित संघर्ष योद्धा म्हणून ज्यांनी यात्रा काढली त्यांना अजित पवार यांच्यावर बोलायचं अधिकार नाही. कारण अजित पवार यांनी इतरांच्या मतदारसंघापेक्षा रोहित पवार यांच्या मतदारसंघात सर्वात जास्त निधी दिला आहे. ते स्वःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते आमचे नेते कसे काय होतील? पक्ष कसा काय सांभाळतील?


रोहित पवारांनी दादांना एकदा नाही तर तीनवेळा पत्रावर समर्थांनासाठी सह्या दिल्या असं सांगत सुनील शेळकेंनी तीन तारखा सांगितलल्या आहेत.  


१) 22 जून 2022- भाजप सोबत गेलं पाहिजे- अजित दादा दालन मंत्रालय 


२) 2 जुलै 2022- विरोधी पक्षनेते करा यासाठी समर्थन, माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली- वाय बी चव्हाण सेंटर 


३) 2 जुलै 2023 - सत्तेत सहभागी व्हायला हवं- देवगिरी मुंबई


काय म्हणाले सुनील शेळके? 


20 जून 2022 ला महाविकास आघाडी सरकार कोसळत आहे हे लक्षात आलं त्यावेळी पक्षातील सर्व नेत्यांनी निर्णय घेतला. अजित पवार जे म्हणतील त्याला आपला पाठिंबा असेल आणि एक पत्र तयार करण्यात आलं. ज्यामध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 47 आमदार त्यावेळी उपस्थित होते. या पत्रात माझ्या आधी रोहित पवार यांनी सही केली होती. या पत्रावेळी अजित पवार यांनी सांगितले की भाजप सोबत आपल्याला जायचं नाही. त्यांनी नकार दिला. 


2 जुलै 2022 ला नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेतला आणि अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर 32 आमदारांनी सह्या केल्या होत्या. सत्तेत जायचं ठरलं होतं त्यावेळीं 52 आमदार यांनी सह्या केल्या होत्या


आम्ही 2 जुलै 2023 रोजी महायुतीत गेलो त्यावेळी रोहित पवार यांना विचारलं देखील नाही. आम्ही निर्णय घेतला आणि अजित पवार यांना सांगितल आणि आम्ही सत्तेत सहभागी झालो. 


अजित पवार यांनी दुसरी पिढी निर्माण केली नाही असं ते म्हणतात मग सुनिल शेळके, नीलेश लंके, राज नवघरे या सर्व सामान्य लोकांना संधी कुणी दिली? जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला सोडून दुसऱ्याला कुणाला निवडून आणलं हे जाहीर करावं. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीतून बाहेर जाऊन भाजप सोबत जाणं आणि आता महायुती मध्ये सहभागी होणं हे सर्व निर्णय सर्वानुमते होती.


ही बातमी वाचा: 



VIDEO : काकाचे होऊ शकले नाहीत, ते आमचे कसे होतील? सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा