एक्स्प्लोर

मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द!

आज माझा भाजपात प्रवेश झाला, आदराने प्रवेश झाला. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीशभाऊ संकटमोचक आहेत, आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी गेल्यानंतर नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुधाकर बडगुजर व त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाने नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊतील कसिनो बारमधील फोटो बडगुजर यांनीची खासदार संजय राऊतांना पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे, या पक्षप्रवेशाला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) हजर राहतील का नाही असा प्रश्न होता. अखेर, मंत्री गिरीश महाजन यांनी एक कॉल केला अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बडगुजर यांना भाजप (BJP) प्रवेश झाल्यानंतर, यापुढे चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश तंतोतंत पाळेन, निष्ठेने काम करेन, असे त्यांनी म्हटलं.   

आज माझा भाजपात प्रवेश झाला, आदराने प्रवेश झाला. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीशभाऊ संकटमोचक आहेत, आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहिती नाही. मात्र, मी निष्पाप आहे, असे सुधाकर बडगुजर यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातल्यानंतर केला. कोरोना काळात मी काम केलं, कोणी बाहेर येत नव्हतं. मात्र, अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल. महाराष्ट्रात जो पहिला प्रकल्प सांडपाण्यातून वीज निर्मितीचा केला, तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता, ते दूरदृष्टीचे नेते आहेत, असे म्हणत बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.  गिरीश भाऊ आपण, बावनकुळे साहेब, रविंद्र चव्हाण साहेब जे मार्गदर्शन करणार त्याचे आपण पालन करू, निष्ठेने काम करु आणि परिकाष्ठा करु असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपलं भाषण संपवलं. 

मनभेद नाहीत, मतभेद आहेत - बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झालाय. आम्ही सर्व कोअर ग्रुपचे पदाधिकारी, त्यांच्यासोबत चर्चा केली, तेव्हा सर्वच पदाधिकारी बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल आणि अधिक ताकदीनं आम्हाला पुढे जाता येईल, असे म्हटले. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मी सकाळी पाहाटे निघालो तेव्हा वाटलं 2-3 दिवसांनी पक्षप्रवेश ठरेल. मात्र, आजच मंगळवार असल्याने त्यांनी आज ठरवलं, त्यामुळे आम्हाला पोहोचायला उशीर झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. स्टेज बनवून आमची इच्छा पक्षप्रवेशाची इच्छा होती. मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते दूर होईल याचा विश्वास आहे. त्या त्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो, कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे, असेही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं.

हेही वाचा

काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज'कारण'

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget