Manoj jarange: राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शांतता रॅलीत दगडफेक होऊ शकते असा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटल्यानंतर ठाकरेंचें नाव न घेता जर माझ्या मनात असते तर याला धाराशिवच्या बाहेर जाऊ दिले नसते, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या पश्चिम दौऱ्यात सोलापूरमधून ते बोलत होते.


मनोज जरांगेच्या या विधानामुळे आता मोठी खळबळ उडाली असून मनसे प्रमुख राज ठाकरेंवर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांनी कालपासून पश्चिम दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी प्रिाश आंबेडकरांसह राज ठाकरेंच्या आरक्षण कशाला हवंय या वक्तव्यावर जोरदार निशाणा साधलाय.


काय म्हणाले जरांगे?


महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असे राज ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंचे नाव न घेता ते म्हणाले, काल सोलापूरात एकजण बोलला होता, त्याच्या दौऱ्यात नुसते बोर्डच बोर्. माणसंच नव्हती. जर माझ्या मनात असते तर याला धाराशिवच्या बाहेर जाऊ दिले नसते. आपण संयमी आहे. दमानं घेतो. एकदा मागं लागलं की काय होतं हे तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहित आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो त्याची सुट्टी नाही.


दरम्यान, राज ठाकरेंना त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारण्यासाठी काही मराठा आंदोलक धाराशिवमध्ये गेले होते. त्यांनी हॉटेलमध्ये घुसत राडा केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.


धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांचा राडा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्यांना भेटीची वेळ मागितली. मात्र, आंदोलकांना वेळ नाकारण्यात आली. धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी  असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली. बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये 10 मिनीटे चर्चा झाली. 


राज ठाकरेंनी पळवाट वापरली


राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे पुढचे आहेत. ते मला फोनही करणार नाहीत. तसंच ते आरक्षणाबाबत काही करणारही नाहीत आणि ते येणारही नाहीत. मराठ्यांच्या पोरांनी त्यांना जाब विचारला. मात्र, राज ठाकरे यांची ती एक पळवाट होती. अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंतरवली सराटीमध्ये राज ठाकरे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले होते. त्यावेळी आरक्षणाबाबत अभ्यासकांची टीम बसवतो असं ते म्हणाले होते.


हेही वाचा!


राज ठाकरेंच्या विरोधातील आंदोलन अंगलट, हॉटेलमध्ये घुसत राडा केल्याप्रकरणी 11 तरुणांवर गुन्हे दाखल