एक्स्प्लोर

Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?

Solapur Vidhan Parishad Election : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत 'न्यू राष्ट्रीय समाज पार्टी'चे उमेदवार अशोक वाघमोडे यांचा अर्ज बाद झाला आहे.

Solapur MLC Election Ashok Waghmode Case : राजकीय वर्तुळात कधी कोणता धक्कादायक आणि अनाकलनीय प्रकार समोर येईल, याचा नेम नसतो. सध्या अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Solapur Vidhan Parishad Election) विधान परिषद निवडणुकीत असाच एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला. उमेदवारी अर्जावर चक्क सूचक आणि अनुमोदकांच्या बोगस सह्या करून अर्ज दाखल केल्याचा प्रकार छाननी प्रक्रियेत उघड झाला. या भयंकर गैरप्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवाराचा अर्ज थेट बाद केला आहे. 'न्यू राष्ट्रीय समाज पार्टी'चे अधिकृत उमेदवार अशोक वाघमोडे यांच्यावर ही नामुष्की ओढावली असून, त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरविण्यात आलं.

Solapur Bogus Signatures Exposed : 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या

सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने अशोक वाघमोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नियमानुसार, या उमेदवारी अर्जासोबत सोलापूर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 10 लोकप्रतिनिधींची नावं सूचक आणि अनुमोदक म्हणून जोडण्यात आली होती. मात्र, निवडणूक कार्यालयात अर्जांची छाननी सुरू असतानाच या प्रकरणाला अत्यंत नाट्यमय वळण मिळालं.

अर्जावर सूचक म्हणून ज्या 10 सदस्यांची नावे होती, त्यापैकी 5 सदस्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केलं. आम्ही उमेदवार अशोक वाघमोडे नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, तसेच या उमेदवारी अर्जावर असलेल्या सह्या आमच्या नाहीत, असा दावा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केला. 

संबंधित उमेदवाराने निवडणूक यंत्रणेची फसवणूक करण्यासाठी आपल्या बोगस आणि बनावट सह्या केल्याचा खळबळजनक दावा करत, हा अर्ज त्वरित बाद करण्यात यावा, अशी आग्रही मागणी या सदस्यांनी केली.

Collector Rejects Candidate Application : उमेदवारी अर्ज अवैध

सूचकांनी घेतलेले गंभीर आक्षेप, प्रत्यक्ष दिलेली साक्ष आणि सादर केलेली कायदेशीर प्रतिज्ञापत्रे लक्षात घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेतला. त्यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार अशोक वाघमोडे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक आणि कायदेशीर निकषांवर पूर्णपणे अवैध ठरवत बाद (Rejected) केला. यामुळे वाघमोडे यांचा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच पत्ता कट झाला आहे.

Corporators Demand Criminal Case : ...तर फौजदारी गुन्हा दाखल करा; नगरसेविका आक्रमक

निवडणूक लढवण्यासाठी थेट आपल्या नावाचा आणि स्वाक्षरीचा इतका मोठा गैरवापर झाल्याचे पाहून हरकत घेणाऱ्या नगरसेविका आणि इतर लोकप्रतिनिधी कमालीचे संतप्त झाले आहेत. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची थट्टा उडवणाऱ्या उमेदवार अशोक वाघमोडे यांच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा (Criminal Case) दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी संबंधित नगरसेविकांनी प्रशासनाकडे केली. त्यामुळे आता या उमेदवारावर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget