एक्स्प्लोर

Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: पहिले 6 खासदार फुटले, आता BMC मध्येही ठाकरेंना धक्का; मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी होणार

Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Shivsena UBT Deepak Sawant Disqualification: एकीकडे ऑपरेशन टायगर (Shivsena Opration Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत (Shivsena UBT Deepak Sawant Disqualification) यांच्यावर अपात्रतेची कारवाईची घोषणा करण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेची प्रत महापालिकेकडे दाखल झाली आहे. दीपक सावंत भांडूपमधील प्रभाग क्रमांक 111 मधून निवडणून आले होते. 

 दीपक सावंत यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले होते. जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची नगरसेवकांची संख्या 65 वरुन 64 होणार आहे. कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते. मात्र जात पडताळणी समितीने कुणबी दावा फेटाळला. त्यामुळे आता भांडुपमधील जागा रिक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Shivsena UBT Deepak Sawant Disqualification)

दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर ठाकरे गटाच्या समितीमधील गणित बदलणार? (BMC Shivsena UBT)

मुंबई महापालिका सभागृहात जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा निर्णय मंजूर झाला, तर त्याचा थेट परिणाम पालिकेतील विविध समित्यांच्या संख्याबळावर होण्याची शक्यता आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर ठाकरे गटाची सभागृहातील संख्या 65 वरून 64 होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती, प्रभाग समिती तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या समीकरणात बदल होऊ शकतो. समित्यांमध्ये पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर सदस्यसंख्या ठरवली जाते. त्यामुळे एका नगरसेवकाची संख्या कमी झाल्यास ठाकरे गटाच्या वाट्याला असलेल्या काही जागांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भांडुपमधील जागा रिक्त झाल्यानंतर आगामी काळात या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, तोपर्यंत पालिकेतील राजकीय गणित बदललेले पाहायला मिळू शकते.

बीएमसीच्या निवडणुकीत कुणी किती जागा जिंकल्या? (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या होत्या. 

मुंबईतील 227 विजयी उमेदवारांची यादी- (BMC All Winner Candidate List 2026)

वॉर्ड 1 - रेखा यादव - (शिंदे शिवसेना)
वॉर्ड 2 – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
वॉर्ड 3 - प्रकाश दरेकर (भाजप)
वॉर्ड 4 - मंगेश पांगारे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 5 - संजय घाडी - शिंदे शिवसेना 
वॉर्ड 6 - दीक्षा हर्षदा कारकर - शिंदे शिवसेना 
वॉर्ड 7 -  गणेश खनकर भाजप 
वॉर्ड 8 - योगिता पाटील भाजपा 
वॉर्ड 9 - शिवानंद शेट्टी - (भाजप)
वॉर्ड 10 -  जितेंद्र अंबालाल पटेल (भाजप)
वॉर्ड 11 -  अदिती फुरुसंगे शिंदे शिवसेना 
वॉर्ड 12 - सारिका झोरे (शिवसेना ठाकरे) 
वॉर्ड 13 - राणी द्विवेदी भाजप 
वॉर्ड 14 - सीमा शिंदे भाजप 
वॉर्ड 15 -  जिज्ञासा शाह भाजप 
वॉर्ड 16 - श्वेता कोरगावकर भाजप 
वॉर्ड 17 -  शिल्पा  सांगुरे भाजप 
वॉर्ड 18 - संध्या जोशी शिदे शिवसेना
वॉर्ड 19 – दक्षता कवठणकर  भाजप 
वॉर्ड 20 – दीपक तावडे (भाजप)
वॉर्ड 21 - लिना पटेल देहरकर (भाजप)
वॉर्ड 22 - हिमांशु पारेख (भाजप)
वॉर्ड 23- शिवकुमार झा ( भाजप)
वॉर्ड 24- स्वाती संजय जयस्वाल ( भाजप)* 
वॉर्ड 25 - निशा परुळेकर (भाजप)
वॉर्ड 26 -  धर्मेंद्र काळे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 27 -  निलम गुरव भाजपा 
वॉर्ड 28 -  अंजता यादव कांग्रेस 
वॉर्ड 29 - सचिन पाटील ठाकरे शिवसेना 
वॉर्ड 30- धवल वोरा भाजप 
वॉर्ड 31 - मनीषा यादव भाजप 
वॉर्ड 32 – गीता भंडारी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वॉर्ड 33  कमरजहो सिद्धिकी कांग्रेस 
वॉर्ड 34-  हैदर अली शेख काँग्रेस 
वॉर्ड 35 -  वर्मा योगेश रणबहादूर भाजप 
वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप)
वॉर्ड 37 -  योगीता कदम (शिवसेना ठाकरे)*
वॉर्ड 38 -  सुरेखा परब मनसे 
वॉर्ड 39 - पुष्पा कळंबे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 40 -  तुळशीराम शिंदे (शिवसेना ठाकरे) 
वॉर्ड 41 -  सुहास वाडकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 42 - धनश्री भडरकर shivsenaa शिंदे 
वॉर्ड - 43  अजित रावरणर शरद पवार 
वॉर्ड 44 -  संगीता शर्मा  भाजप 
वॉर्ड 45 - संजय कांबळे भाजप 
वॉर्ड 46 -  योगिता कोळी (भाजप)
वॉर्ड 47 - तेजिंदर तिवाना (भाजप)
वॉर्ड 48 - रफिक शेख कांग्रेस 
वॉर्ड 49 -  संगिता कोळी कांग्रेस 
वॉर्ड 50 – विक्रम राजपूतप्रतापसिंह(भाजप)
वॉर्ड 51 – वर्षा  टेंबवलकर (शिवसेना)
वॉर्ड 52 - प्रति साटम (भाजप)
वॉर्ड 53 - वळवी जितेंद्र हिरालाल (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 54 - अंकित प्रभू (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 55- हर्ष पटेल (भाजप)
वॉर्ड 56 - लक्ष्मी भाटिया ( (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 57 -  पिल्ले श्रीकला रामचंद्र (भाजपा)
वॉर्ड 58 - संदीप पटेल भाजप 
वॉर्ड 59 -  यशोधर फणसे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 60 – सायली कुलकर्णी भाजप 
वॉर्ड - 61 दिव्या सिंह  कांग्रेस 
वॉर्ड - 62 जिशान मुलतानी शिवसेना ठाकरे 
वॉर्ड - 63 रूपेश सावरकर भाजप 
वॉर्ड - 64 खान सबा हारून रशीद शिवसेना ठाकरे 
वॉर्ड - 65 बंदेरी विठ्ठल भाजप 
वॉर्ड - 66 मेहर हैदर  कांग्रेस 
वॉर्ड - 67 दीपक कोतेकर भाजप
वॉर्ड - 68 रोहन राठोड भाजप 
वॉर्ड - 69 सुधा सिंग भाजप 
वॉर्ड - 70 अनिष मकवाणी भाजप 
वॉर्ड - 71 सुनील मेहता भाजप
वॉर्ड - 72 ममता यादव भाजप 
वॉर्ड - 73 लोना रावत (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड - 74 विद्या आर्या कांगणे मनसे 
वॉर्ड - 75 प्रमोद सावंत शिवसेना ठाकरे 
वॉर्ड - 76 प्रकाश मुसळे भाजपा 
वॉर्ड - 77 शिवानी परब शिवसेना ठाकरे 
वॉर्ड -78 सोफी नाजिया अब्दुल जब्बार शिंदे शिवसेना 
वॉर्ड - 79 मानसी जुवाटकर शिवसेना ठाकरे)
वॉर्ड - 80  दिशा यादव भाजप 
वॉर्ड - 81  केशरबेहन पटेल भाजप 
वॉर्ड - 82 अमीन जगदीश भाजप 
वॉर्ड - 83 सोनाली साबे(शिवसेना ठाकरे)
वॉर्ड - 84 अंजली सामंत भाजप 
वॉर्ड - 85 मिलिंद शिंदे भाजप 
वॉर्ड - 86 रितेश कमलेश राय शिवसेना 
वॉर्ड 87 –  पूजा महाडेश्वर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 88 शर्वरी परब (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 89 गीतेश राऊत शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 90 तुलीप मिरांडा काँग्रेस 
वॉर्ड 91 सगुण नाईक शिवसेना शिंदे 
वॉर्ड 92 इब्राहम कुरेश कांग्रेस 
वॉर्ड 93 रोहिणी कांबळे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 94 प्रज्ञा भुतकर शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 95  हरी शाश्री  शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 96 खान शम्स एनसीपी 
वॉर्ड 97 हेतल गाला भाजपा 
वॉर्ड 98  अलका केरकर भाजप 
वॉर्ड 99  चिंतामनी निवाटे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 100 स्वप्ना म्हात्रे भाजप 
वॉर्ड 101  कॅरन डिमेलो कांग्रेस 
वॉर्ड 102 रेहबर खान कांग्रेस 
वॉर्ड 103 – हेतल गाला मोरवेकर भाजप 
वॉर्ड 104- प्रकाश गंगाधरे (भाजप)
वॉर्ड 105 अनिता वैती भाजप 
वॉर्ड 106 प्रभाकर शिंदे भाजप 
वॉर्ड 107 – नील किरीट सोमय्या (भाजप)
वॉर्ड 108 दीपिका घाग भाजप 
वॉर्ड 109 सुरेश शिंदे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 110  आशा कोपरकर कांग्रेस 
वॉर्ड 111 दिपक सावंत शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 112  साक्षी दळवी भाजप 
वॉर्ड 113 दिपमाला बढे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 114 राजुल पाटील शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 115 राजभोज ज्योती अनिल मनसे 
वॉर्ड 116 जागृती पाटील भाजप 
वॉर्ड 117 श्वेता पावसकर शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 118 सुनीता जाधव शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 119 राजेश सोनावळे  शिवसेना शिंदे 
वॉर्ड 120 विश्वास शिंदे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 121- प्रियदर्शनी ठाकरे (उबाठा)
वॉर्ड 122- चंदन शर्मा, भाजप
वॉर्ड 123 – सुनील मोरे (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 124 – शकीना शेख (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 125 सुरेश आवळे शिंदे शिवसेना 
वॉर्ड 126 अर्चना भालेराव (भाजप)
वॉर्ड 127 स्वरूपा पाटील शिवसेना ठाकरे 
वॉर्ड128 सई शिर्के मनसे 
वॉर्ड 129 अश्विनी मते शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 130  धर्मेश गिरी भाजप 
वॉर्ड 131 राखी जाधव भाजप 
वॉर्ड 132  रितू तावडे भाजप 
वॉर्ड 133 निर्मिती कारंडे शिवसेना शिंदे 
वॉर्ड 134 मेहजेबीन खान (एमआय एम)
वॉर्ड 135 – नवनाथ बन(भाजप)
वॉर्ड 136 जमीर कुरेशी (एमआयएम)
वॉर्ड 137 पटेल समीर रमजान (एमआयएम)
वॉर्ड 138 रोशन शेख एमआयएम 
वॉर्ड 139 शबाना शेख एमआय एम 
वॉर्ड 140 - विजय उबाळे एमआयएम 
वॉर्ड 141  विठ्ठल लोकरे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 142 अपेक्षा खांडेकर शिवसेना शिंदे 
वॉर्ड 143 शहांना काझी - एमआयएम 
वॉर्ड 144 दिनेश पांचाळ भाजप 
वॉर्ड 145 खैरूनिस्सा अकबर हुसेन (एमआयएम)
वॉर्ड 146 समृद्धी काठे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 147 प्रज्ञा सदाफुले (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 148 अंजली नाईक शिवसेना शिंदे 
वॉर्ड 149 सुषम सावंत भाजप 
वॉर्ड 150 वैशाली शेंडकर काँग्रेस 
वॉर्ड 151 कशिश फुलवरिया भाजप 
वॉर्ड 152 आशा मराठे भाजप 
वॉर्ड 153 मीनाक्षी पाटणकर शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 154 महादेव शिवगण भाजप 
वॉर्ड 155 स्नेहल शिवकर शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 156 – अश्विनी माटेकर (शिवसेना)
वॉर्ड 157 – आशा तवडे (भाजप)
वॉर्ड 158 चित्रा सांगळे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 159 प्रकाश मोरे भाजप 
वॉर्ड 160 किरण लांडगे शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 161 विजेयद्र शिंदे शिवसेना शिंदे 
वॉर्ड 162  अमिर खान कांग्रेस 
वॉर्ड 163 – शैला लांडे (शिवसेना)
वॉर्ड 164 हरीश भांदिर्गे भाजप 
वॉर्ड 165 – अशरफ आझमी (काँग्रेस)
वॉर्ड 166  मीनल तुर्डे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 167 समन आझमी (कांग्रेस)
वॉर्ड 168  सइदा खान कांग्रेस 
वॉर्ड 169 - प्रविणा मोरजकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 170 बुशरा नदीम (कांग्रेस)
वॉर्ड 171 राणी येरुनकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड  172 राजश्री शिरवडकर (भाजपा)
वॉर्ड  173 - शिल्पा केळुसकर (भाजपा)
वॉर्ड 174 - साक्षी कनोजिया (भाजपा)
वॉर्ड  175 - मानसी सातमकर (शिवसेना शिंदे)
 वॉर्ड  176 रेखा यादव (भाजपा)
वॉर्ड  177  कल्पेशा कोठारी (भाजप)
 वॉर्ड  178 अमेय अरुण घोले (शिवसेना शिंदे 
वॉर्ड  179 दिपाली खेडेकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 180 तृष्णा विश्वासराव शिंदे शिवसेना 
वॉर्ड 181 अनिल कदम, शिवसेना - उबाठा
वॉर्ड 182 – मिलिंद वैद्य (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 183 – आशा काळे (काँग्रेस)
184 - सजिदाबी खान काँग्रेस 
वॉर्ड 185 टी एम जगदीश (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 186  अर्चना शिंदे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 187 - जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 188 भास्कर शेट्टी शिवसेना शिंदे 
वॉर्ड 189  हर्षला मोरे ठाकरे शिवसेना 
वॉर्ड 190 शीतल गंभीर भाजप 
वॉर्ड 191 विशाखा राऊत, शिवसेना ठाकरे 
वॉर्ड 192  यशवंत किल्लेदार मनसे 
वॉर्ड 193 – हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 194 निशिकांत शिंदे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 195 विजय बाणगे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 196 पद्मजा चेंबुरकर (शिवसेना ठाकरे)
 वॉर्ड 197 - वनिता नरवणकर ( शिवसेना शिंदे)
वॉर्ड 198 - आबोली खाड्ये ( शिवसेना ठाकरे)
 वॉर्ड 199 - किशोरी पेडणेकर ( शिवसेना ठाकरे
वॉर्ड 200- उर्मिला पांचाळ (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 201 – इरम सिद्दीकी (इतर)
वॉर्ड 204- किरण तावडे ( शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 205 - सुप्रिया दळवी ( मनसे)
वॉर्ड 206 - सचिन पडवळ ( शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 207 – रोहिदास लोखंडे (भाजप)
वॉर्ड 208 रमाकांत रहाटे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 209 यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 210 सोनम जामसूतकार (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 212 अब्रहणी अमरीन शेहजाद (सपा)
वॉर्ड 213 नसीमा जुनेजा कांग्रेस 
वॉर्ड 214 – अजय पाटील (भाजप)
वॉर्ड 215 – संतोष ढोले (भाजप)
वॉर्ड 216- राजश्री भातणकर ( भाजप)
वॉर्ड 217- गौरंग झवेरी (भाजपा)
वॉर्ड 221- आकाश पुरोहित भाजप 
वॉर्ड 222- रिटा मकवाना भाजप 
वॉर्ड 223- ज्ञानराज निकम कांग्रेस 
वॉर्ड 224- पारक अमीन कांग्रेस 
वॉर्ड 225- हर्षिता नार्वेकर भाजप 
वॉर्ड 226- मकरंद नार्वेकर भाजप 
वॉर्ड 227- गौरवी शिवल नार्वेकर, भाजप

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल यांच्याकडून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या निर्णयाचं जोरदार समर्थन
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल E20 च्या समर्थनासाठी मैदानात
Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget