एक्स्प्लोर

Shivsena-BJP BMC Mayor: फडणवीस-शिंदेंची खेळी आणि मनसेचा पत्ता कट होणार; भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय घडतंय?, Inside Story

Shivsena-BJP BMC Mayor: मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी हाती आली होती. त्यासाठी शिंदेसमर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी जाणार होते.

Shivsena-BJP BMC Mayor: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2026) भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं (BJP-Shivsena Shinde Group) सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी हाती आली होती. त्यासाठी शिंदेसमर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी जाणार होते. पण अचानक त्यांनी नोंदणीसाठी जाणं टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटनोंदणीचा निर्णय झाल्याचं समोर आलं होतं. परंतु भाजपचा एकत्र गट स्थापन करण्याचा प्रस्ताव मात्र शिवसेनेने अद्याप मान्य केलेला नाही, अशी माहिती आली आहे. त्यामुळेच भाजप-शिवसेनेचा (Shivsena-BJP Alliance) मुंबई महानगरपालिकेतील तिढा सुटत नाही.

स्थायी समिती आणि सुधार समिती यात पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजप–शिंदे सेना युतीकडे 13 सदस्य असून, ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि एआयएमआयएम मिळूनही 13 सदस्य आहेत. अशा स्थितीत अध्यक्षपद चिठ्ठीद्वारे ठरवले गेले, तर विरोधकांच्या बाजूने निकाल लागल्यास सत्ताधारी युतीस मोठा फटका बसू शकतो. ही नामुष्की टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेने एकत्र नोंदणी केल्यास स्थायी समिती व सुधार समितीत भाजप व शिंदे सेनेच्या सदस्य संख्येत वाढ होत असल्याने मनसेचा सुधार समिती सदस्य पदातून पत्ता कट होणार आहे. (Shivsena-BJP Yuti)

महापौर, स्थायी समिती आणि सुधार समिती शिंदेंना देण्यास भाजप तयार नाही- (Eknath Shinde Devendra Fadnavis)

एकत्रित नोंदणी केल्यास दोन्ही समितीत महायुतीचे संख्याबळ अधिकचे असून भविष्यात कुठेलेही पालिकेतील निर्णय घ्यायचे झाल्यास ते बहुमताच्या जोरावर घेता येऊ शकतात. यामुळेच दोन्ही समितींच्यासाठी बहुमत स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला एकत्रित नोंदणीची गळ घातली जात आहे. उद्भवलेल्या या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडूनही महापौर भाजपने घेतल्यास स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे ही मागणी लावून धरली आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेतील संख्याबळ लक्षात घेता भाजप महापौर, स्थायी समिती आणि सुधार समिती शिंदेंना देण्यास तयार नसल्याचे सूत्रांचे माहिती आहे.

राज्यातील हायकमांडकडून एकत्र गट नोंदणीसाठी गळ- (BJP-Shivsena Yuti Mumbai)

पडद्या आडून भविष्यात एखाद्या निर्णयावर शिंदेंच्या नगरसेवकांनी विरोध केल्यास संबंधित प्रकल्प किंवा निर्णयास बहुमत लक्षात घेऊन विरोध होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एकत्रित येऊन गटस्थापन केल्यास पक्षाने बजावलेला व्हीप हा शिंदेंच्या नगरसेवकांनाही लागू राहील. त्यामुळे बहुमताच्या आधारावर भाजप शिवसेना एखादा निर्णय किंवा प्रकल्प मार्गी लावण्यास मदतही होईल आणि पुढील 5 वर्षे निश्चिंत राहता येईल. त्यामुळेच दोन वेळा गट नोंदणीसाठी निघालेल्या शिवसेना नगरसेवकांना भाजपच्या राज्यातील हायकमांडकडून एकत्र गट नोंदणीसाठी गळ घातली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप- 89
शिवसेना ठाकरे गट- 65
शिवसेना- 29
काँग्रेस- 24 
मनसे- 6 
एमआयएम- 8 
एनसीपी- 3 
एसपी- 2 
एनसीपी शप- 1 
————
एकूण- 227

संबंधित बातमी:

BMC Mayor 2026: शिंदेंच्या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलला; ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महायुतीची खेळी, मुंबईत काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget