Shivajirao Nalawade : सहकार क्षेत्रातलं मोठं नाव, राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य, अजितदादांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शिवाजीराव नलावडे कोण आहेत?
Shivajirao Nalawade : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज (दि.28) मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Shivajirao Nalawade : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज (दि.28) मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे Shivajirao Nalawade) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाजीराव नलावडे हे या अगोदर दोन वेळा पूर्व उपनगरातून विधानसभा निवडणूक लढले आहेत. तसेच पदवीधर मतदार संघातून ही त्यानी निवडणूक लढली आहे. मात्र त्यांना यश आले नव्हते. मात्र सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपण आठ हजारांपेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ, अशी शाश्वती शिवाजीराव नलावडे (Shivajirao Nalawade) यांनी व्यक्त केली आहे.
कोण आहेत शिवाजीराव नलावडे?
अजित पवार (Ajit Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शिवाजीराव नलावडे Shivajirao Nalawade) राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. राज्याच्या सहाकार चळवळीत शिवाजीराव नलावडे यांचे मोठे नाव असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. शिवाजीराव नलावडे यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. शिवाय, मुंबई शहरात दोन शाळा त्यांनी उभारल्या आहेत. त्यामुळे शिक्षण मित्र म्हणूनही त्यांना ओळखले जाते, असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात विधानसभेच्या 4 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार या 4 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षांकडून जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार शिवाजीराव नलावडे Shivajirao Nalawade) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी Shivajirao Nalawade) सांगितलं. या निवडणुकीत पक्षनेतृत्वाने दिलेल्या संधीचं सोनं करणार असल्याचा विश्वास त्यांनी Shivajirao Nalawade) व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार श्री. शिवाजीराव नलावडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत… pic.twitter.com/iftcD2Q4om
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) May 28, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar on Shivsena : राज्यातील अल्पसंख्याक समाज शिवसेनेसोबत होता, निवडणुकीत काय होईल ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही, अजित पवार थेटच बोलले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
