Bhandara News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्याची साथ सोडणार; अपक्ष निवडणूक लढण्याचीही तयारी
Bhandara : अडीच वर्ष महायुती सोबत राहिल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारनं भंडाऱ्याच्या आमदारांची इच्छा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर हे महायुतीवर नाराज आहेत.
Bhandara News भंडारा : महाराष्ट्रात सत्ताबदल झालं तेव्हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांचा अग्रक्रम होता. अडीच वर्ष महायुती सोबत राहिल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या (Mahayuti) सरकारनं भंडाऱ्याच्या आमदारांची इच्छा पूर्ण केलेली नाही. त्यामुळेचं भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर हे महायुतीवर नाराज असून शिवसेनेची उमेदवारी न घेता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहेत.
मंत्रीपद असो किंवा महामंडळ याची अपेक्षा असताना महायुतीनं मात्र भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना डावललं. त्यामुळेचं भोंडेकर आता महायुतीवर नाराज आहेत. भंडाऱ्यात कार्यकर्ता, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. परिणामी, आमदार नरेंद्र भोंडेकर महायुतीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.
सत्ता बदलाच्या वेळी सर्वात पहिले मी गेलो, मात्र...
मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीने भंडारा जिल्ह्याला झुकतं माप दिलं नाही. किंबहूना त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. असं असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा ठराव घेतल्यानं भोंडेकर महायुतीवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळं ते आता महायुतीतून बाहेर पडून महायुतीची उमेदवारी नं घेता अपक्ष निवडणूक लढायच्या मानसिकतेत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, मी मुळातं अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आग्रहामुळं मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मुळात मी शिवसैनिकचं आहे. त्यामुळे आगामी काळात मी घरी बसणार नाही. तर अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी माझी सुरू आहे. 2019 मध्ये ज्या पद्धतीनं अपक्ष निवडणूक लढली, तशीच आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सत्ता बदलाच्या वेळी सर्वात पहिले मी गेलो. त्यामुळं मला काय द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे आणि का नाही दिलं? याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देतील. असेही आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी भंडारा जिल्ह्याला झुकतं माप दिलं
कार्यकर्त्यांच्या भावना बघून निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीकडून जिल्ह्याच्या विकासासाठी जी अपेक्षा होती ते मिळालं नाही. याची मनात खंत आहे. भाजपनं निवडणूक लढण्याबाबत ठराव घेतला आहे. भाजपला माझा विरोध नाही. मी महायुतीच्या विचाराचा आहे, महायुतीसोबत राहिलो आहे. भाजपनं उमेदवारी देण्याचे ठरवलं असेल तर द्यावा, आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्याला झुकतं माप दिलं नाही.राजकीय स्तर जो एक पाऊल समोर जायला पाहिजे होता, ती मदत व्हायला पाहिजे होती, जेणेकरून आम्हाला समाधान वाटलं पाहिजे होतं. मात्र तसे न झाल्याने आम्ही नाराज असल्याचेही नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
हे ही वाचा