एक्स्प्लोर

Mahayuti: अंतिम जागावाटप जाहीर होण्यासाठी काही तास उरले असतानाच शिंदे गटाने शेवटचा डाव टाकला, चार जणांची यादी भाजपला पाठवली

Maharashtra Politics: शिंदे गटाचा शेवटचा प्रयत्न, रस्सीखेच असलेल्या 4 मतदारसंघांतील इच्छूक उमेदवारांची यादी भाजपला पाठवली. दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या लोकसभेच्या चार मतदारसंघांवरुन भाजपमध्ये तिढा आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये या चार जागांवरुन धुसफूस आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे (BJP) पाठवली. शिवसेनेतील (Shivsena) वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत असा युक्तिवाद  करण्यात आला. त्यामुळे या जागा शिवसेनेला मिळाव्यात असा आग्रह शिंदे गटाकडून महायुतीमध्ये करण्यात आला आहे.

सध्या कोणत्या मतदारसंघात कुणाचा खासदार?

सध्या महायुतीत वादात असलेल्या चारही जागी शिवसेनेचे खासदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे, शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे खासदार आहेत. यापैकी अरविंद सावंत आणि राजन विचारे सध्या ठाकरे गटात आहेत.

अमित शाह यांचा शिंदे गटाला जागा सोडण्यासाठी नकार

काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. यावेळी अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत अमित शाह यांनी भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवेल, असे स्पष्ट केले होते. तसेच लोकसभेच्या एकूण 32 मतदारसंघात आमचेच उमेदवार रिंगणात उतरली, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिंकून येणे हाच उमेदवारीसाठी एकमेव निकष असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. या निकषाचा विचार करता भाजपचे उमेदवार शिंदे गटापेक्षा अधिक सक्षम असल्याचे अमित शाह यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही शिंदे गटाने माघार घेतली नव्हती. मुंबईसह नाशिक, ठाणे आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम आहेत.

महायुतीच्या जागावाटपात 48 पैकी 46 जागा निश्चित?

ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यादृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपचे शांतीगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी याठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. तर दक्षिण मुंबईची जागा भाजपने मनसेला देण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांकडून 48 पैकी 46 जागांबाबत एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक जागांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे आता 28 मार्चला महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल.

आणखी वाचा

मोठी बातमी : चार ऐवजी पाच जागा घ्या, उद्यापर्यंत फायनल सांगा; मविआचा वंचित आघाडीला शेवटचा प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Embed widget