एक्स्प्लोर

माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय

अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada shinde) यांनी पुत्र रणजित शिंदे हे महायुतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळं महायुतीतून माढा मतदारसंघातून शिवसेनेने दावा केलाय.

Madha Vidhansabha Election : महायुतीमध्ये परंपरागत शिवसेनेकडे (Shiv Sena) असणारी जागा अजित पवार यांच्या सत्तेत सहभागी होण्याने त्यांच्या गटाकडे गेली होती. मात्र अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada shinde) यांनी पुत्र रणजित शिंदे हे महायुतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळं महायुतीतून माढा मतदारसंघातून शिवसेना लढण्याच्या तयारीला लागली आहे. याबाबत 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात र्निणय होण्याची  शक्यता असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितले  शिवाजी सावंत (Shivaji Sawant) हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू असून गेल्या 30 वर्षापासून ते माढा तालुक्यात राजकारणात सक्रीय आहेत.

आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी शिवाजी सावंत यांची ओळख

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पारंपारिक विरोधक म्हणून शिवसेनेने आजवर काम केले आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी शिवाजी सावंत यांची ओळख आहे. शिंदेंच्या विरोधात जवळपास 70 ते 75 हजार मते त्यांनी घेतली आहेत.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा यांच्या सोबत आलेल्या आमदार बबनदादा शिंदे यांनी लोकसभेतील पराभवानंतर अजितदादा यांची साथ सोडत पुन्हा स्वगृही म्हणजे शरद पवार गटात जाण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. 

माढा मतदारसंघ शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढून जिंकेल, सावंतांचा दावा

दरम्यान, माढ्यातून शरद पवारांनी जर तिकीट दिले तर आपण मुलाला म्हणजे रणजित शिंदे यांना उभे करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. जर तिकीट नाही मिळाले तर अपक्ष उभे करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळं महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे . यातच आमदार शिंदे यांनी आता महायुती हा विषय आपल्यासाठी संपल्याचे जाहीर केल्याने महायुती मधील स्थानिक नेते व कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यामुळेच आता माढा मतदारसंघ शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढून जिंकेल असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे. 

शिवसेनेचा मार्ग मोकळा 

आमदार शिंदे यांना तुतरीकडून उमेदवारी मिळाल्यास शरद पवार गटातील सर्व शिंदे विरोधक त्यास टोकाचा विरोध करतील. अशा परिस्थितीत दुखावलेली अजितदादा यांची राष्ट्रवादीही शिवसेना, भाजपच्या मदतीने आमदार शिंदे यांना पराभूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करेल.  त्यामुळेच शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर ही जागा जिंकेल असा दावा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केला आहे. आमदार शिंदे यांना महायुतीचे तिकीट मिळणार म्हणून शिवसैनिक नाराज होते. पण आता आमदार शिंदे यांनीच महायुतीशी नाते संपवत असल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेचा मार्ग मोकळा होणार आहे . 

माढा मतदारसंघात पारंपारिक शिंदे विरुद्ध सावंत लढत होणार?

सध्या शिवसेनेकडे जिल्हातील केवळ सांगोल्याची एकच जागा असून आता माढा मतदारसंघ मिळवण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे बोलले जात आहे. सध्या अजित पवार गटाकडे या विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी केवळ कल्याणराव काळे यांचे एकच नाव चर्चेत आले असले तरी महायुतीच्या एकूण मतांचा विचार करता ही जागा शिवसेना आरामात जिंकू शकेल अशी भूमिका सावंत यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात पुन्हा शिवसेना अशी पारंपारिक लढत होऊ शकणार आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात रंगत वाढणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 8 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यावेळेला माढ्याची जागा ही शिवसेनेला घेण्याबाबत पदाधिकारी भेट घेणार आहेत. जर शिंदेंना महायुती नको असेल तर महायुतीच मोठ्या फरकाने जागा जिंकून दाखवेल असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे. आता महायुती पुढे ही जागा कोणाला द्यायची हा पेच निर्माण झाला असून यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मतदारसंघ शिवसेनेला मिळवतील अशी आशा शिवसैनिकांना आहे. आता सोलापूर मध्यची जागा महायुतीत शिवसेनेला मिळणार का? यावर येथील लढत अवलंबून असेल. सध्या तरी माढ्यातून आमदार शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हे तुतारी किंवा अपक्ष निवडणूक लढवायच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात अभिजीत पाटील यांनी आधीच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता या लढाईत शिवसेना उतरल्याने रंगत वाढणार आहे .

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget