एक्स्प्लोर

Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार?

Konkan Politics : ठाकरे गटाचा विद्यमान खासदार असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिंदे गट दावा करणार?शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार राजकीय चर्चा

Konkan Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फार मोठा अवधी शिल्लक राहिलेला नाही. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी देखील हळूहळू केली जात आहे. त्यातच आता कोकणातील (Konkan) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. याला कारण ठरलंय बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेलं वक्तव्य.

भाजप कोकणातली लोकसभेची जागा शिंदे गटासाठी सोडणार?
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा उमेदवार रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून उभा राहू शकतो, असं वक्तव्य दीपक केसरकार यांनी केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने येणार का? तसेच मुख्य बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाल्यास भाजप ही जागा शिंदे गटासाठी (Shinde Group) सोडणार का? अशी चर्चा कोकणातल्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. 

मिशन लोकसभा अंतर्गत भाजपचं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर लक्ष
तत्पूर्वी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली आहे. त्यानुसार 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. असून यामध्ये कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासह बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा देखील समावेश आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला होता.रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे भाजपने या दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत यापूर्वीच कामाला सुरुवात देखील केली आहे. अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात खासदार नेमका कोणाचा होणार? याच्या चर्चा आतापासूनच सुरु झाली आहेत.

इतर महत्त्वाची बातमी

लोकसभेसाठी ठाकरेंचं जोरदार प्लानिंग; शिंदेंच्या 12 खासदारांपैकी 5 लोकसभा मतदारसंघात तयारी अंतिम टप्प्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget