उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शशिकांत शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंविरोधात कंबर कसली
Satara Lok Sabha Election 2024 : शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं असून ते आज अर्ज दाखल करतील.
सातारा : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आज उमेदवारी अर्ज दाखल (Lok Sabha Nomination Form) करणार आहेत. शशिकांत शिंदे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या रॅलीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली असून आज ते शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील.
शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार
शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची भव्य रॅली निघणार आहे. यामध्ये शरद पवार उपस्थित असतील. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेतेमंडळी ही या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मित्र पक्षातील ही प्रमुख नेतेमंडळी या शक्तिप्रदर्शना हजेरी लावणार आहेत.
अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत. या रॅलीचे स्वरूप भव्यदिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली आहे. रथातून ही रॅली साताऱ्यातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या राजपथावरून निघणार आहे. महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले आहेत. शशिकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.