Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरूर हे नेहमीच आपल्या ट्विटर पोस्टसाठी चर्चेत असतात. आताही त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. सोमवारी शशी थरूर यांनी साहित्यिका गीतांजली श्री यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. गीतांजली श्री यांनी अलीकडेच यावर्षीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. त्या लंडनमध्ये शशी थरूर यांना भेटल्या, जिथे हे दोघे जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. 


गीतांजली श्रींचा सोमवारी वाढदिवस होता


शशी थरूर यांनी गीतांजली श्री यांच्यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही हातात स्ट्रॉबेरी (लिची) धरलेले दिसत आहेत. या फोटोवरून शशी थरूर यांना खूप ट्रोल करण्यात येत आहे. हा फोटो शेअर करत शशी थरूर यांनी लिहिले की, "काल रात्री लंडनमध्ये बर्थडे गर्लची भेट झाली आणि यादरम्यान दोघांनी स्ट्रॉबेरीचा आनंद घेतला." लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये 10 ते 12 जून दरम्यान जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.






या पोस्टमुळे शशी थरूर यांना खूप ट्रोल केले जात आहे. यूजर्स या पोस्टवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. शशी थरूर यांनी ज्यावेळी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्या वेळी दिल्लीत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून मोदी सरकारविरोधात निदर्शने करत होता. राहुल गांधींच्या समर्थनार्थ पक्षाचे बडे नेते आणि मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले होते. अशा वेळी शशी थरूर लंडनमध्ये असल्यानेही प्रश्न उपस्थित होत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


इस्लामोफोबियाच्या वाढत्या घटनांवर मौन सोडा, शशी थरूर यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन