एक्स्प्लोर

Sharmila Pawar on Supriya Sule : आम्ही सूना लग्न करुन आलोत, पवारांचा ओरिजनल डीएनए सुप्रिया ताईंमध्येच, शर्मिला पवारांचे अजितदादांना प्रत्तुत्तर

Sharmila Pawar on Supriya Sule, Baramati : तुम्ही आजवर पवार नावाच्या व्यक्तींनाच मतदान करत आला आहे. अगोदर पवार साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मला केलं. आताही पवारांनाच मतदान करा, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

Sharmila Pawar on Supriya Sule, Baramati : तुम्ही आजवर पवार नावाच्या व्यक्तींनाच मतदान करत आला आहे. अगोदर पवार साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मला केलं. आताही पवारांनाच मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील लोकांना केले होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही (Sharad Pawar) याला प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवार म्हणाले, अजित पवार काहीही चुकलेलं नाही, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यामध्ये फरक आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. भाजप नेत्यांपासून अजित पवारांपर्यंत सर्वांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

शरद पवारांच्या वक्तव्याचे शर्मिला पवारांकडून समर्थन 

शरद पवारांच्या विधानाचे आता पवारांच्या दुसऱ्या सूनेकडून म्हणजेच शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे. बारामतीतील भाषणात शर्मिला पवार यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. " पवारांचा ओरिजनल डीएनए सुप्रिया ताईंमध्येच आहे", असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत. 

शर्मिला पवार काय काय म्हणाल्या ? 

शर्मिला पवार म्हणाल्या, सुप्रियाताईंना पाठिंबा देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने आलात, याबद्दल मी आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने  मनापासून आभार व्यक्त करते.  येणाऱ्या 7 मे ला आपल्याला तुमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत, ज्यांनी आजपर्यंत संसद गाजवण्याचे काम केले आहे. तुमच्या आमच्या गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं काम यशस्वीपणे केलेले आहे. त्या सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल मत द्यावे.  तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा पुढचं बटन दाबून पुन्हा एकदा ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती आपल्याला करते. 

सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत

एक छोटासा मुद्दा सध्या गाजतोय. आज मी इथे आहे, नंदा वहिनी आहेत. काकी आहेत, शुभांगी आहेत. या आम्ही पवारांच्या सुना आहोत. मूळ पवार कोण हे साहेबांनी सांगितले. त्याच्यावरुन टीका होऊ लागली. परंतु, एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते. मी किंवा आम्ही सर्व सूना आम्ही पवारांच्या घरांमध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत. आम्ही लग्न केलं, या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत.  परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत. त्यांच्या रक्ताने त्या या नात्यांमध्ये आहेत.  त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे, असंही शर्मिला पवार यांनी स्पष्ट केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, अमित शाहांची सांगलीत फटकेबाजी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget