एक्स्प्लोर

Sharad Pawar Varkari Community Controversy: शरद पवारांनी हिंदू समाजाची ताकद वाटण्याचा प्रयत्न करू नये, संजय शिरसाटांची बोचरी टीका

Sharad Pawar Varkari Community Controversy: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केलीय.

Sharad Pawar Varkari Community Controversy: वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केले. वारकरी संप्रदायात सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, या प्रबोधनाच्या मार्गावर महिलांचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आता यावरून सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. 

संजय शिरसाट म्हणाले की, वारकरी संप्रदायात अनेक जातीचे लोक असतात. एकाच जातीचा कुणी नसतो. त्यामुळे त्याला जातीय बळ देणे हा प्रचार सुरू असून, हिंदू समाजाला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. हिंदू समाजाची ताकद वाटण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नयेत. त्यात जातीय घुसखोरी होईल, असे म्हणू नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

Sanjay Shirsat on Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी सावध राहिले पाहिजे 

दरम्यान, अशोक खरातच्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे की नाही हे माहीत नाही. पण, त्यांनी सावध राहिले पाहिजे. राजकारणात असा धोका असतो. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चाकणकर आहे की कोण हे तपासात समोर येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Sanjay Shirsat on Vijay Wadettiwar: असे वक्तव्य करणे म्हणजे दिवाळखोरी

अशोक खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती. मात्र जात-धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे, असं मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, असे वक्तव्य करणे म्हणजे दिवाळखोरी आहे. अनेक मुस्लिम बाबा जेलमध्ये आहेत. 2012-13 पासून अनेकजण जेलमध्ये आहे. राम रहीम जेलमध्ये आहे. कोणताही बाबा असो त्याच्या जातीवर जाऊ नयेत. हिंदु मुस्लिम करण्यापेक्षा बलात्कारी, अशी भूमिका पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Shirsat on Ashok Kharat Case: लवकरच खरातच्या सहकाऱ्यांचे नावं समोर येतील

अशोक खरात प्रकरणाबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, अशोक खरात प्रकरण फक्त अत्याचारापर्यंत मर्यादित नाही. जमीन घोटाळ्यांसह यात अनेक गुंतागुंत आहे. चौकशीची कसोटी आहे. पण लवकरच त्याच्या सहकाऱ्यांचे नावं समोर येतील आणि ते जेलमध्ये जातील, असे त्यांनी म्हटले. 

Sanjay Shirsat on Nashik IT Company Conversion Case: अत्याचार होत असेल तर...

नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की,  ही कॉर्पोरेट विभागात लागण लागली आहे. हे प्रकरण कुठपर्यंत गेले याची चौकशी झाली पाहिजे. अत्याचार होत असेल तर याचे परिणाम किती आहे? हे शोधले पाहिजे. यासाठी सगळ्या एजन्सी काम करत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा 

Sharad Pawar Varkari Community Controversy: मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget