(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहितेंना विजयी करा, सोलापूर जिल्हा चमकेल, शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली
Sharad Pawar : चंद्रभागा अडवली, ती दुष्काळी जिल्ह्याच्या शेतशेतात पाणी जाईल. कानासाच्या दाण्यात पांडूरंग दिसेल, असं उजनी धरण करताना यशवंतराव चव्हाण सांगायचे. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. उजनीमुळे हे शक्य झाले.
Sharad Pawar :"चंद्रभागा अडवली, ती दुष्काळी जिल्ह्याच्या शेतशेतात पाणी जाईल. कानासाच्या दाण्यात पांडूरंग दिसेल, असं उजनी धरण करताना यशवंतराव चव्हाण सांगायचे. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. उजनीमुळे हे शक्य झाले. इथली द्राक्षे, डाळींब, केळी जगात जातात. ही क्रांती उजनी व शेतकऱ्यांमुळे झाली. आज पिढी बदलली. दोन्ही उमेदवारांची आधीची पिढी आमच्यासोबत काम करत होते. दोन्ही उमेदवाराचे विचार चांगले आहेत. प्रणिती शिंदे (Praniti Shinde), धैर्यशील मोहिते विजयी झाले तर संसदेत सोलापूर जिल्हा चमकेल", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) , शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराजे देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते.
मोदी लोकांसाठी सत्ता वापरात नाहीत
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मोदी लोकांसाठी सत्ता वापरात नाहीत. आता भाषणात नेहरू-गांधी यांच्यावर टीका करतात. नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्षे तुरुंगात घालवली. देशाची प्रगती करून जगात नेहरूंनी केले. प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना सोबत घेवून जायचे तर ते जाती जातीत भांडणे लावत आहेत.
रशियातील पुतीन आणि तुमच्यात काय फरक ?
पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, विशिष्ट विचार सरणीच्या लोकांच्या विचारणे देश चालवतात. पुन्हा सोरेन आणि केजरीवाल यांचे उदाहरण दिले. यांनी चांगले काम केले पण मोदी धोरणावर टीका टिप्पणी केली म्हणून जेल मध्ये टाकले. अनिल देशमुखांना 6 महिने तुरुंगात टाकले , संजय राऊतही यांनाही तीन महिने तुरुंगात टाकले. यासाठी सत्ता घेता ? रशियातील पुतीन आणि तुमच्यात काय फरक ? असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी उपस्थित केला.
जागृत राहून परिवर्तन करावे लागेल. लोकशाहीवर संकटाचे ढग दिसत आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहितेंना मतांचा विक्रम करून संसदेत पाठवा. मी संसदेत आहे त्यांच्या पाठीशी राहून काम केले जाईल, असंही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या