Sharad Pawar in Beed : शिवसेनेते झालेल्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी पक्षात देखील बंडखोरी पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आमदार सहकाऱ्यांना सोबत घेऊन, भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत देखील दोन गट झाले आहेत. दरम्यान, शरद पवारांनी अजित पवारांच्या गटातील महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा धडका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) उद्या अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेत आहे. त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार उद्या काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार उद्या बीडमध्ये सभा घेणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत झालेल्या दोन गटानंतर धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले आणि त्यांना कृषिमंत्री पद देखील मिळाले. त्यामुळे आता शरद पवार उद्या धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. राष्ट्रवादी पक्षात धनंजय मुंडे महत्वाचे नेते समजले जातात. महाविकास आघाडीत देखील त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. तसेच त्यापूर्वी विरोधात असतांना विरोधी पक्षनेते पद देखील मुंडे यांना मिळाले होते. त्यामुळे उद्याच्या सभेत शरद पवारांच्या भाषणात धनंजय मुंडे निशाण्यावर असणार असल्याची शक्यता आहे.
सभेची जोरदार तयारी...
शरद पवार उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे या सभेची जबाबदरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या दोन्ही नेत्यांकडून या सभेची तयारी करण्यात येत आहे. बीडच्या माने कॉम्प्लेक्समध्ये ही सभा होणार आहे. त्यामुळे या सभेसाठी क्षीरसागर आणि शेख यांच्याकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात सभेच्या पूर्वतयारीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहे.
रोहित पवारांनी घेतला आढावा...
शरद पवारांच्या सभेपूर्वी रोहित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौरा केला आहे. यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या सभा स्थळाची पाहणी केली. शरद पवारांचे विचार टिकवण्यासाठी या सभेला हजारो नागरिकांची गर्दी होणार असल्याचे ते म्हणाले. संघर्षाच्या पाठीशी सर्व जनता उभी असल्याचं रोहित पवार म्हणाले. बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची सभा होत असल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही सभा होईल असे बोलले जात आहे. मात्र, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कुठलाही जिल्हा हा कोण आहे का? किंवा त्याचा नसतो, कारण या जिल्ह्यातील लोकांनी एका विचार धारेला मतदान केलेलं असतं. तर, शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्यातील मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे चार आमदारांना निवडून दिल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Supriya Sule : शरद पवार आणि अजितदादा यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहित नाही : सुप्रिया सुळे