Supriya Sule : माझ्या आणि अजितदादांच्या जन्माच्या आधीपासून चोरडिया आणि पवार कुटुंबाचे संबंध आहेत. या दोन कुटुंबातील व्यक्तिंनी भेटणे यात नवीन काही नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी केलं. चोरडिया यांच्या घरी झालेल्या चर्चेत मी नव्हते. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत मला माहित नसल्याचे सुळे म्हणाल्या. लोकशाहीत अनेकदा मतभेत असतात, ते असलेच पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.


कौटुंबीक नाती वेगळी आणि राजकीय मते वेगळी 


चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ झालं आमचे संबंध असल्याचे सुळे म्हणाल्या. चोरडिया यांच्या घरी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. याबबात सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. मी त्या बैठकीत नव्हते, त्यामुळं त्यात नेमकं काय झालं ते मला माहिती नसल्याचे सुळे म्हणाल्या. दरम्यान, अनेकवेळा राजकीय मतभेद असतात. सरोज पाटील या शरद पवार यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. अनेकवेळा त्यांचे पती एन डी पाटील आणि शरद पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पण नात्यात कधीही अंतर पडले नाही, असेही सुळे म्हणाल्या. कौटुंबीक नाती वेगळी आणि राजकीय मते वेगळी असल्याचे सुळे म्हणाल्या.


आर आर पाटील यांचे योगदान आयुष्यभर विसरणार नाही


राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. आर आर पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू होते. एकही दिवस असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही. आर आर पाटील यांचे योगदान आयुष्यभर विसरणार नसल्याचे सुळे म्हणाल्या. सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची आठवण महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल असेही सुळे म्हणाल्या. आबा गेल्यानंतर वहिंनीनी जबाबदारी घेतली. रोहितच्या रुपाने आता नवे नेतृत्व पुढे येत असल्याचे सुळे म्हणाल्या. 


नवाब मलिक यांच्यावर राजकीय सुडाने कारवाई


नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. त्याच्याविरोधत ते मोठ्या हिंमतीन लढल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. नवाब मलिक हे सत्याच्या बाजून राहिलेला दृष्टा नेता आहे. त्यांच्यावर राजकीय सुडाने कारवाई करण्यात आली असल्याचे सुळे म्हणाल्या. ते घरी आले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी खूप सहन केले आहे. दरम्यान, या काळात अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या लेकी ज्या पद्धतीनं लडल्या त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे सुळे म्हणाल्या. 


महत्त्वाच्या बातम्या:


Vijay Wadettiwar : शरद पवार सोबत आले तरच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना अट; वडेट्टीवारांचा दावा