Sushma Andhare On Hanuman Chalisa : मागील काही दिवसांत हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांच्याकडून सतत हनुमान चालिसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. त्यातच, लोकसभेतील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा वाचवून दाखवत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. दरम्यान, राणा आणि शिंदे यांच्या याच टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकाचवेळी उत्तर दिले आहे. राणा यांच्या अमरावतीत बोलतांना, "हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले?" असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे. 


काय म्हणाल्यात अंधारे? 


आपण कधीच विचार करत नाही, हनुमान चालिसा म्हटली म्हणजे म्हटली. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा म्हटली, हो म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले? आहेत. जर हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्य यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, ते जिवंत होत असतील तर मीरोज सकाळ, संध्याकाळी, रात्री दिवसभरात हनुमान चालिसाम्हणत राहिल. जर हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावर गेलेलं 27 जीव परत येत असतील तर निश्चितच आम्ही सर्व हनुमान चालिसा म्हणायाला तयार आहोत. कुठली गोष्ट कुठे नेतायत. लोकप्रतिनिधी यांनी लोकांची प्रश्न मांडली पाहिजे, असे असतांना ते प्रश्नच मांडले जात नाही. पक्षाचे राजकारण सोडून द्या. प्रत्येकवेळी जाहिरातीसारखं बोलायची गरज नाही. 


आरोग्य भरतीच्या एवढ्या जागा रिक्त असतांना भरल्या जात नाही. त्यावर यांना कधी प्रश्न विचारले जात नाही आणि ते देखील यावर बोलत नाही. हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा किंवा उर्जा वाया घालवण्यापेक्षा ठाण्यात जे रुग्ण दगावले त्याकडे लक्ष दिले जात नाही. जात आणि धर्माच्या नावावर फक्त भडकवण्याचे काम सुरु आहे. 


संभाजी भिडेंसह फडणवीसांवर टीका...


संभाजी भिडे सारखा माणूस आमच्या महापुरुषांबद्दल गरळ ओकत आहे. हा कोणता धर्म असू शकतो. त्यामुळे हा धर्म आम्ही मान्य कसा करायचा. त्यामुळे फडणवीस कसले गृहमंत्री आहेत. एखाद्याने फक्त फेसबुकवर पोस्ट लिहली तरी त्याच्यावर कारवाई करून आत टाकतात. तसेच देशद्रोही असल्याचा गुन्हा दाखल करतात. पण, इथल्या महापुरुषांबद्दल अगदी वाटेल त्या पद्धतीने गरळ ओकणाऱ्या भिडेंना मात्र तुम्ही पाठीशी घालतात, असा आरोप अंधारे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sushma Andhare : भाजपनेच किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढला; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल