NCP Sharad Pawar on Mumbai Mahapalika Election : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर शरद पवारांच्या (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादीत देखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार सुरु झालाय.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई महापालिकेला 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.17) प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या  बैठकीत महापालिकेला किती जागा लढू शकतो आणि सध्याची पक्षाची मुंबईतील परिस्थितीत याबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पक्षाच्या वतीने लवकरच मुंबई प्रांताचं शिबिर आयोजित करण्यात येणार तसेच इच्छुकांच्या मुलाखतींचं देखील लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबई महापालिकेला 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत 


पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली 


बैठकीत महापालिकेला किती जागा लढू शकतो आणि सध्याची पक्षाची मुंबईतील परिस्थितीत याबाबत सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली 


पक्षाच्या वतीने लवकरच मुंबई प्रांतांच शिबिर आयोजित करण्यात येणार तसेच इच्छुकांच्या मुलाखतींच देखील लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती


दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यात चुकीचं काही नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. त्यांना सतरंजी उचलायला ठेवायचं का? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देखील संजय राऊतांप्रमाणेच स्वतंत्र लढण्याचा सूर आवळला होता. याशिवाय काँग्रेस पक्ष देखील स्वबळाचा नारा देणार असल्याची चर्चा आहे. 


दुसरीकडे महायुतीतील पक्ष देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या, असं सातत्याने म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीतील पक्ष देखील स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवतील, असं बोललं जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Walmik Karad: अजितदादांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने घातला गंडा; शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितली आपबिती, नेमकं काय घडलं?


Pune Accident: पुणे जिल्ह्यात झालेल्या 2 विचित्र अपघातात 12 जण ठार, पहिली जेजुरीजवळ तर दुसरी नारायणगावजवळील घटना